जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात दुचाकींचा अपघात,दोन जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी-नाशिक मार्गावर झगड्या फाट्यानजीक काळ सायंकाळी ०७.४० वाजेच्या सुमारास एम.एच.१७ डब्ल्यू.११९४ वरील चालक नाव गाव माहिती नाही त्याने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाची दुचाकी हयगईने चालवून रा.खेड शिवतर ता.पालघर जिल्हा रत्नागिरी येथील दुचाकीस्वार सुजल सुरेश विचार (वय-१८) व त्याचा सहकारी अजय गोस्वामी यांना जखमी करून त्यांना औषधोपचार न करता घटनास्थळावरून फरार झाला आहे.

फिर्यादी व त्यांचा मित्र हे कोपरगाव तालुक्यातील सावळीविहिर ते भरवस फाटा मार्गाने शिर्डीकडून नाशिककडे जात असताना त्यांस सायंकाळी ०७.४९ वाजेच्यास सुमारास मागून येणाऱ्या वरील क्रमांकाच्या दुचाकीने जोराची धडक दिली आहे.घटना घडल्यानंतर आरोपी दुचाकीस्वार हा घट्नास्थळावरून फिर्यादी व त्यांचा मित्र यांना उपचारासाठी दवाखान्यात न नेता फरार झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी सुजल विचार व त्याचा सहकारी अजय गोस्वामी हे शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिराच्या दर्शनासाठी आले होते.व दर्शन करून आपल्या घरी जात असताना कोपरगाव तालुक्यातील सावळीविहिर ते भरवस फाटा मार्गाने शिर्डीकडून नाशिककडे जात असताना त्यांस सायंकाळी ०७.४९ वाजेच्यास सुमारास मागून येणाऱ्या वरील क्रमांकाच्या दुचाकीने जोराची धडक दिली आहे.घटना घडल्यानंतर आरोपी दुचाकीस्वार हा घट्नास्थळावरून फिर्यादी व त्यांचा मित्र यांना उपचारासाठी दवाखान्यात न नेता फरार झाला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी सुजल विचारे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी दुचाकीस्वार याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक फौजदार यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१३७/२०२२ भा.द.वि.कलम २७९,३३७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,अ.ब.१७७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनखाली सहाय्यक फौंजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close