जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

संगमनेर जवळ अपघात,दुचाकी स्वार तरुण जागीच ठार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामपंचायत हद्दीत आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात वहाने दिलेल्या धडकेत काळ्या रंगाची व लाल पांढरे पट्टे असलेली हिरो डिलक्स या दुचाकी वरील स्वार (क्रं.एम.एच.जी.एस.४२३९) तरुण नितेश बालाजी पुरी (वय-२१) जागीच ठार झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र त्याला कोणत्या वहानाने धडकवले हे समजु शकले नाही.सदर वहान मात्र घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती संगमनेर येथील पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान घटनास्थळी मेडिकेअर हॉस्पिटलची रुग्णवाहिका(क्रं.एम.एच.४१ ए.जी.६८५) हि घटनास्थळी आली होती.घटनास्थळी बघ्यानी गर्दी केली होती.अज्ञात वहानाने मयत तरुणाला बेरच फूट फरफटत नेले असल्याचे व डोक्याचा चेंदामेंदा झल्याचे दिसत होते.व घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडलेला दिसत होता.

काही सुज्ञ प्रवाशांनी व नागरिकांनी त्या मयत तरुणांच्या डोक्यावर पंधरा कपडा टाकलेला दिसून आला आहे.मयत तरुणांची माहिती उशिरा समजली असून तो पुणे येथील असल्याचे समजते.त्याच्या नातेवाईकांना पोलिसानी कळवले आहे.घटना स्थळावरून सदर तरुणास संगमनेर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असून तेथे सदर तरुणांचे शव उत्तरीय तपासणी नंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीस पोलीस अधिकाऱ्यांना याची खबर दिली आहे.मात्र बरेच वेळ पर्यंत अधिकारी पोहचू शकले नव्हते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close