जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दोन लाखांची चोरी उघड,आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चास नळी ग्रामपंचायत हद्दीत नुकतेच पत्र्याच्या गोदामाचे पत्रे उचकटून २३ हजार ६०० रुपयांचे १३ क्विंटल गहू व ०७ हजार ५०० रुपयांचे एक क्विंटल सोयाबीन असा २१ हजार १०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला होता.या बाबत फिर्यादी निलेश ताराचंद ब्राम्हणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.या बाबत पोलीस अधिकारी दौलतराव जाधव यांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवून आरोपी अविनाश मच्छीन्द्र कांबळे,(वय-२९) संदीप बबन पवार (वय-१९) एक बालक आरोपी राहुल सुनील खैरनार (वय-१७) आदी तीन चोरट्यांना एक दिवसांचे आत जेरबंद केले असून त्यांच्या कडून टाटा कंपनींच्या छोटा हत्तीसह ०२ लाख ०६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दरम्यान या घटनेत वरील तिन्ही आरोपीना पोलिसांनी अटक करून कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यानां न्यायालयाने आरोपी अविनाश मच्छीन्द्र कांबळे,संदीप बबन पवार या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे चासनळी येथील रहिवासी असून त्यांच्या मालकीचे गोदाम आहे.त्यांनी त्यात २३ हजार ६०० रुपयांचे १३ क्विंटल गहू व ०७ हजार ५०० रुपयांचे एक क्विंटल सोयाबीन असा २१ हजार १०० रुपयांचा ऐवज साठवून ठेवला होता.व योग्य भाव आल्यावर तो विक्रीस न्यावयाचा असा त्यांचा उद्देश असताना त्यावर पाळत ठेऊन अज्ञातच चोरट्यांनीं मंगळवार दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ०७ ते रात्री १० च्या सुमारास आपली करामत दाखवली होती. व वरील ऐवज लंपास केला होता.हि बाब मालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गु.क्रं.१३०/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे अज्ञातच चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली व गोपनीय खबऱ्या मार्फत तपास केला असता त्यांना चोरट्यांची माहिती प्राप्त झाली होती.पोलिसांनी या प्रकरणी आरोपीना सापळा पावला असता त्यांच्या जल्यातच चोरटे अलगत अडकले आहे.त्यात आरोपी अविनाश मच्छीन्द्र कांबळे,(वय-२९) संदीप बबन पवार (वय-१९) एक बालक आरोपी राहुल सुनील खैरनार (वय-१७) आदी तीन चोरट्यांना एक दिवसांचे आत जेरबंद केले असून त्यांच्या कडून टाटा कंपनींच्या छोटा हत्तीसह ०२ लाख ०६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दरम्यान या घटनेत वरील तिन्ही आरोपीना पोलिसांनी अटक करून कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यानां न्यायालयाने आरोपी अविनाश मच्छीन्द्र कांबळे,संदीप बबन पवार या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.दरम्यान या कामगिरीत दौलतराव जाधव यांचे सह पो.हे.कॉ.संदीप बोटे,युवराज खुळे,चालक राम साळुंके यांनी भूमीका पार पाडली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close