जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलगी पळवली,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय फिर्यादीची अल्पवयीन मुलगी जातेगाव टेंभी ता.वैजापूर येथील आरोपीने बेकायदेशीररित्या पळवली असल्याची फिर्याद मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान सदर तरुण हा या फिर्यादीच्या इसमाच्या नात्यातील असून तोही याठिकाणी वैजापूर तालुक्यातील जातेगाव टेंभी येथून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दिला होता.त्यानेच संधी साधून हा कार्यक्रम राबवला असल्याचे समजत आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.त्यामुळे वारी व परिसरात खळबळ उडाली आहे.
त्या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीचे वडील हे वारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून त्यांचा शेत मजुरीचा व्यवसाय आहे.तेथे ते आपल्या पत्नी,आई,वडील,व आपल्या सतरा वर्षीय लहान मुलीसह दोन मोठ्या भावंडासह राहत होती.रविवार दि.१७ एप्रिल रोजी दुपारी ०२.५० वाजेच्या सुमारास जातेगाव टेंभी येथील आरोपीने आपली मुलगी काही तरी प्रलोभन दाखवून अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेली आहे.त्यामुळे त्यांनी आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे शोध घेऊन कंटाळून त्यांनी अखेर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सुरेश आव्हाड व फौजदार ए.व्ही.गवसने यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१३५/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close