जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

निळवंडेच्या लाभक्षेत्रात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी (वय- ) एका सहकारी बँकेच्या कर्जबाजारी पणामुळे व भावकीच्या त्रासाला कंटाळून आपल्या गायीच्या गोठ्यात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची खळबळ जनक माहिती हाती आली आहे.यात सत्ताधारी गटाच्या एका बड्या नेत्याच्या सहकारी बँकेचे नेमके कर्ज किती याचा त्याने लिहून ठेवलेल्या चिट्टीत उल्लेख नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.या प्रकरणी अद्याप कोणतीही चौकशी झाली नसल्याची माहिती नजीकच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.हि बहादरपूर येथील दुसरी तर दुष्काळी भागातील सहावी आत्महत्या समजली जात आहे.

संकल्पित छायाचित्र

या बाबत कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी,”या प्रकरणी आपण घट्नास्थळी भेटी दिली असून अहवाल तयार केला आहे.व मदतीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार”असल्याचे सांगितले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे उर्फ ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प-२ या प्रकल्पाचे काम वार्तमानात वेगाने सुरु असले तरी या प्रकल्पाला जवळपास ५२ वर्ष उलटली आहे.मात्र या दुष्काळी भागाला वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.यात या लाभक्षेत्रातील सहकारी साखर कारखानदारीतील नेत्यांनी या प्रकल्पाचे पाणी चोरून आपल्या दारू प्रकल्पांना वापरले आहे.या बाबत निळवंडे कालवा कृती समितीने वारंवार हि बाब उघड केली आहे.मात्र या उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांनी केवळ निवडणुका काढण्याचे काम अद्याप पर्यंत केले आहे.या बाबत कालवा कृती समितीने रस्त्यावरील लढाई करताना उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत हि लढाई सुरु ठेवली आहे.मात्र अद्यापही प्रसिद्धी लोलुप नेत्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याची एकही संधी सोडली नाही.उलट या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे पाणी लाभक्षेत्राबाहेर देण्याचे षडयंत्र आखले आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज फेडण्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध नाही.परिणाम स्वरूप शेतकरी आपल्या मुलींचे लग्न,मुलांचे उच्च शिक्षण,आरोग्य समस्या,यातच कर्जबाजारी होऊन आपली मान फासावर चढवून जीवनयात्रा संपवत आहे.अशीच धक्कादायक घटना बहादरपूर येथे दि.२९ मार्च रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.ती शाळेतून आलेल्या त्यांच्याच मुलामुळे नुकतीच उघड झाली आहे.या बाबत या मयत शेतकऱ्याच्या जवळचे नातेवाईक डॉ.विजय शिंदे रा.सायाळे ता.सिन्नर यांनी हि बाब आमच्या प्रतिनिधीच्या लक्षात आणून दिली आहे.व याबाबत आपण शेवटपर्यँत लढून मयत शेतकऱ्यास न्याय मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की,”मयत शेतकरी अल्पभूधारक असून तो आपली शेती सांभाळून अन्यत्र मंजुरीने काम करत होता.मात्र या परिसरात वारंवार पडणारे दुष्काळ व थोडकी शेती यामुळे त्याचा हातातोंडाचा मेळ घालणे कठीण जात होते.त्यास आई,वडील,पत्नी,एक मुलगा,दोन मुली,विभक्त एक भाऊ असा परिवार आहे.आपला जवळचा नातेवाईक असून त्याच्यावर कोपरगाव तालुक्याचे सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणाऱ्या एका नेत्याच्या सहकारी बँकेचे कर्ज होते.त्यामुळे तो चिंतेत होता.त्यातून त्याचा स्वतःवरील ताबा सुटला होता.त्यातच त्याला आपल्या भावकितील काही लोकांनी त्रास दिल्याने व त्यातून २६ जानेवारी रोजी भांडण तंटे उदभवल्याने त्याने या जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला होता.व त्यानुसार त्याने दोन पानांची चिठ्ठी लिहून त्यात सर्व वृत्तांत लिहून ठेवला आहे.

संकल्पित छायाचित्र

दरम्यान या घटने बाबत शिर्डी येथील पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपण त्याच दिवशी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याबाबत पूढील कार्यवाहीबाबत त्यांना माहिती सांगता आली नाही व आपण रजेवर असून वर्तमानात अन्य अधिकाऱ्यांकडे कार्यभार असल्याचे सांगितले आहे.

त्यात मुद्दा क्रमांक ०५ मध्ये उल्लेख करून त्याने वर्तमानात असलेल्या लोक प्रतिनिधीने आडनाव न लिहिता अमुक-अमुक दादा.. असा उल्लेख करून प्रथम त्यांचे आभार मानले आहे.व माफी मागितली आहे.व “तुम्ही जो विश्वास दाखवला, त्या बद्दल ऋण व्यक्त करून,”मी पण शब्द पाळला आहे” पुढे लिहिताना तो म्हणतो मी,”गेल्यावर माझे कुटुंब उघड्यावर येणार आहे”त्यामुळे तुम्ही,” तुमचे कर्ज माझ्या मूला-मुलींसाठी माफ करावे” हि विनंती.व पुढे आपला विश्वासू म्हणून उल्लेख केला आहे.व खाली शेवटी सही करुन तारीख टाकली आहे.

मुद्दा क्रं.०६) मध्ये तो म्हणतो,”माझ्या खेटून असणाऱ्या भावबंधाचे मनःपूर्वक अभिनंदन ! पण,”मी तुमचा दुश्मन कधीच नव्हतो”,”मला कायम वाटायचे आपण सगळे एकच आहे” पण,”तुम्ही माझ्यावर हात उचलला तेंव्हा मी संपलो” असे म्हणून…

मुद्दा क्रमांक-०७ मध्ये “मृत्यू पच्छात खांदेकरी कोण करायचे हेही लिहून ठेवले आहे.

प्रारंभी त्याने आपल्या आई,वडील,ताई,नाना,तुमची माफी मागतो असे म्हणून नाना माझेशी बोलले याचा खूप आनंद झाला” असे म्हणून त्यांची पण माफी मागितली आहे.

मुद्दा क्रं.०२ मध्ये त्याने माझे, मुले खूप चांगले आहे”असे म्हणून भावाला विनवले आहे.त्यात,”माझे काही चुकले असेल तर माफ कर” पण मी तुला कधीच त्रास दिला नाही” पण,”आता माझ्या कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर आहे”असे आर्जव केले आहे.

मुद्दा क्रमांक-०३ मध्ये तो म्हणतो,” माझ्या फाशीचा कोणाशीच संबंध नसून मी संगळ्यांची माफी मागत आहे””माझ्या बायकोवर कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी वाढली असुन मी तिची सुद्धा माफी मागतो” असे म्हटले आहे.

मुद्दा क्रं.०६ यात मित्रांच्या सहकार्याचा उल्लेख असून,” मला खूप सहकार्य केल्याबद्दल आपण त्यांची माफी मागतो” असे म्हटले आहे.

मुद्दा क्रं.०८ मध्ये मी,” गावाकडे कधीच पैसे मागितले नाही.लाचार झालो नाही” मी त्यांचाही आभारी आहे.

मुद्दा क्रं.०९ मध्ये तो म्हणतो,”माझ्याकडून मित्रांना थोडा-थोडा पैशाचा धोका होत होता.पण कोणत्याच मित्रासाठी तो जास्त नव्हता.म्हणून त्यांनी मला माफ करावे” असे शेवटी म्हटले आहे.

मुद्दा क्रं.१० मध्ये तो म्हणतो,”काही मित्राकडून २० हजार रुपयांची अपेक्षा होती. त्यांनी पण खूप प्रयत्न केले.पण त्यांना यश आले नाही.पण त्यांनी प्रयत्न केले” त्याबद्दल त्यांची या खास मित्राने माफी मागितली आहे.व “तुमचा खास मित्र.”तुमच्यासाठी जीवाची पर्वा न करणारा..! काकासाहेब….! म्हणून पुढे पूर्ण नाव लिहुन उल्लेख केला आहे.

प्रत्येक मुद्याखाली त्या शेतकऱ्याने तारीख टाकून सही केली आहे.या घटनेमुळे नगर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close