जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात विद्युत मोटारीची चॊरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथील रहिवासी असलेले इसम सुखदेव मच्छीन्द्र जाधव (वय-६०) यांच्या मालकीची चैतन्यनगर जेऊर पाटोदा येथील १० हजार ७०० रुपये किमतीची स्टार्टरसह विद्युत मोटार आरोपी संजय उर्फ जयस्वाल छोटूलाल परदेशी रा.ब्रिजलाल नगर याने काल रात्री ०९ वाजे नंतर चोरून नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी सुखदेव जाधव हे सुभाषनगर येथील रहिवासी असून त्यांची शेती हि जेऊर पाटोदा येथील चैतन्यनगर येथे आहे.त्या ठिकाणी त्यांनी विंधन विहीर खोदून त्या ठिकाणी बोरमध्ये एक लक्ष्मी कंपनीची मोटार स्टार्टरसह पाणी उपसा करण्यासाठी टाकली होती.मात्र तीच्यावर वरील आरोपी संजय परदेशी याची वाकडी नजर होती त्यातून हि चोरी झाल्याचा आरोप केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सुखदेव जाधव हे सुभाषनगर येथील रहिवासी असून त्यांची शेती हि जेऊर पाटोदा येथील चैतन्यनगर येथे आहे.त्या ठिकाणी त्यांनी विंधन विहीर खोदून त्या ठिकाणी बोरमध्ये एक लक्ष्मी कंपनीची मोटार स्टार्टरसह पाणी उपसा करण्यासाठी टाकली होती.मात्र तीच्यावर वरील आरोपी संजय परदेशी याची वाकडी नजर होती.त्याने दि.०७ मार्च रोजी रात्री ०९ वाजे नंतर पाळत ठेऊन कोणाचे लक्ष नाही हि संधी साधून त्या ठिकाणाहून ती फिर्यादी यांचे संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून काढून नेली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी सुखदेव जाधव यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केली आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५४/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.पी.बी.नाईक हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close