कोपरगाव तालुका
महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत-आश्वासक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत.विकासाच्या अनेक क्षेत्रात आपल्यातील बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी मोठी प्रगती केली असून स्त्री-पुरुष या भेदातीत भावनेला फाटा देण्याचे काम केले असून स्त्री शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“आपल्या देशातील स्त्री सुधारकांनी केलेले महिलांविषयक कार्य महत्वाचे असून महिलांनी हे कार्य लक्षात घेणे गरजेचे आहे.आज स्त्रियांसाठी अनेक कायदे निर्माण होत होत आहेत त्यांनी आत्मविश्वासाने उभे रहाणे गरजेचे आहे”-अड्.पूनम गुजराथी,अध्यक्षा कोपरगाव महिला वकील संघ.
कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात जागतिक महिला दिन,कै.सुशीलामाई काळे यांचे स्मृती प्रीत्यर्थ आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा परितोषिक वितरण व विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध शाँर्ट टर्म कोर्सेसचा शुभारंभ आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप हे होते.
सदर प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोपरगाव वकील संघाच्या अध्यक्ष अँड.पूनम गुजराथी,महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.विजय निकम,जुनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे,वक्तृत्व स्पर्धा प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर महिलांसह विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
त्या वेळी त्या पुढे बोलताना म्हणाल्या की,”सक्षम व उच्च विचारातून महिलांनी स्वत:चा विकास घडवावा.या बाबतीत समाजाचा विचार करू नये किंबहुना समाजाचा विचार करीत स्वतः मधील नैसर्गिक योग्यतेचा विकास खुंटू देवू नये.माईंच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण महिला दिनी होते हे माझ्यासाठी महत्वाचे असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले आहे.
सदर प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.व विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध शाँर्ट टर्म कोर्सेसचा शुभारंभ आजच्या शुभदिनी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.श्रद्धा लोखंडे व वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ.सौ.रांधवणे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे तर सूत्रसंचलन प्रा.छाया शिंदे यांनी केले.तर प्रा.डॉ.योगिता भिलोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.