जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

औरंगाबाद दरोड्यातील आरोपी कोपरगावात जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणारा व पोलिसांना अनेक महिन्यापासून गुंगारा देणारा आरोपी भगवान बडोद भोसले याच्या आज कोपरगाव तालुका पोलिसानी मुसक्या आवळल्या असून त्यास औरंगाबाद पोलिसांच्या हवाली केले आहे.

औरंगाबाद जिल्याह्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून फरार झालेला आरोपी कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील सराईत गुन्हेगार भगवान भोसले याने त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा गुन्हा घडवून आणला होता.या प्रकरणी त्या ठिकाणी नेमका किती ऐवज गेला होता.व त्यात जीवित हानी किती झाली होती.याबाबत सविस्तर वृत्त मिळाले नाही.तथापि त्यास आज पोलिसांनी जेरबंद केले आहे.

सदरची सविस्तर वृत्त असे की,औरंगाबाद जिल्याह्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून फरार झालेला आरोपी कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील सराईत गुन्हेगार भगवान भोसले याने त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा गुन्हा घडवून आणला होता.या प्रकरणी त्या ठिकाणी नेमका किती ऐवज गेला होता.व त्यात जीवित हानी किती झाली होती.याबाबत सविस्तर वृत्त मिळाले नाही.

तथापि या आरोपीच्या मागावर कोपरगाव व औरंगाबाद पोलीस होते.दरम्यान तो नुकताच आपल्या मूळ गावी आला असल्याची गुप्त खबर कोपरगाव तालुका पोलिसांना लागली होती.त्यांनी त्या खबरीनुसार आज छापा टाकला असता ती खबर खरी निघाली असून त्याच्यावर पोलिसांनी झडप घालून जेरबंद केले आहे.दरम्यान आमच्या प्रतिनिधीने तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरवसे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो सफल झाला नाही.

दरम्यान त्यास औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुरवसे यांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close