जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकींचा अपघात,एक ठार,एक जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर-कासली या पंतप्रधान सडक रस्त्यावर दि.०७ फेब्रुवारी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास बजाज कंपनीच्या दोन दुचाकीची कट मारल्याने समोरासमोर टक्कर होऊन त्यात दहिगाव बोलका येथील इसम बाळासाहेब दौलतराव शेटे (वय-५८) यांचे निधन झाले आहे तर त्यांची पत्नी निर्मला बाळासाहेब शेटे (वय-५३) या जखमी झाल्या आहेत.दरम्यान तालुका पोलिसानी या प्रकरणी त्याच गावातील आरोपी संतोष बबन निघोट याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दि.०७ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३.१५ वाजेच्या सुमारास जात असताना संवत्सर-कासली रस्त्यावर संदीप देवराम परजणे यांचे शेताचे शेजारीं आरोपी संतोष बबन शेटे हा आपल्या ताब्यातील बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.क्यु.६२३१) कासलीकडून संवत्सरकडे भरधाव वेगाने चालवून,रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून,हयगईने आपल्या ताब्यातील वहानास कट मारून,भरधाव चालवून कट जात असताना समोरच्या दुचाकीस जोराची धडक दिली.त्यात आपले वडील बाळासाहेब दौलतराव शेटे यांचे निधन झाले आहे. तर त्यांची पत्नी निर्मला बाळासाहेब शेटे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयताचा मुलगा फिर्यादी सागर भाउसाहेब शेटे (वय-३५) यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यात त्यांनी म्हटलं आहे की,”आपले मयत पिताश्री बाळासाहेब शेटे व आई निर्मला शेटे हे दोघे आपल्या बजाज कंपनीची सी.टी.१०० दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.ए.३०३२) वरून दि.०७ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३.१५ वाजेच्या सुमारास जात असताना संवत्सर-कासली रस्त्यावर संदीप देवराम परजणे यांचे शेताचे शेजारीं आरोपी संतोष बबन शेटे हा आपल्या ताब्यातील बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.क्यु.६२३१) कासलीकडून संवत्सरकडे भरधाव वेगाने चालवून,रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून,हयगईने आपल्या ताब्यातील वहानास कट मारून,भरधाव चालवून कट जात असताना समोरच्या दुचाकीस जोराची धडक दिली.त्यात आपले वडील बाळासाहेब दौलतराव शेटे यांचे निधन झाले आहे. तर त्यांची पत्नी निर्मला बाळासाहेब शेटे या गंभीर जखमी झाल्या आहेत.घटनेनंतर मयतास व जखमीस तातडीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारार्थ दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वडील बाळासाहेब शेटे याना मृत घोषित केले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३९/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४(अ)(ब) १७७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close