जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात एकाचे अकस्मात निधन,पोलिसांत नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालयाशेजारी रहिवासी असलेले इसम शेख सलीम अब्दुल्ला (वय-५०) हे आपल्या राहत्या घरी दि.१३ फेब्रुवारी दुपारी ०३ वाजेपुर्वी मृत आढळून आल्याची खबर त्यांचा मुलगा शेख हसन अब्दुल्ला (वय-५०) यांनी काल रात्री कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काल सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास दाखल केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,खबर देणार यांनी आपल्या फिर्यादित म्हटलें आहे की,आपण कोपरगाव शहरातील जुन्या मामलेदार कचेरीजवळ रहिवासी असून तेथे आपण आपल्या कुटुंबासॊबत राहतो.दि.१३ फेब्रुवारो रोजी दुपारी ०३ वाजे पूर्वी आपले वडील शेख सलीम हे राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आले आहे.मात्र मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा त्यात तपशील आढळून येत नाही.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१५/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close