जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलगा गायब,कोपरगाव तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरा नजीक असलेल्या सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत मोतीनगर येथे रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलगा (वय-१७) यास काल सायकांळी ०५.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगा विघ्नेश निवृत्ती इंगळे (वय १३ वर्ष ८ महिने) यास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने पळवून नेले असल्याची फिर्याद मुलाच्या आई मेघा निवृत्ती इंगळे (वय-३२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.३० ते ०७ वाजेच्या सुमारास आपली अल्पवयीन तेरा वर्ष ०८महिने आपल्याला,”काही एक न सांगता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मुलगा विघ्नेश यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे रखवाले तून अपहरण केले आहे.

अल्पवयीन मुली पळून किंवा पळवून नेण्याचा घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.मात्र कोपरगाव तालुक्यात बऱ्याच अवधीने अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या प्रकरणी मुलाच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,आपण सुरेगाव मोतीनगर हद्दीत येथे रहिवासी असून त्या ठिकाणी आपले कुटुंब आणि मुले अशा कुटुंब कबिल्यासोबत राहतो.सोमवार दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.३० ते ०७ वाजेच्या सुमारास आपली अल्पवयीन तेरा वर्ष ०८महिने आपल्याला,”काही एक न सांगता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मुलगा विघ्नेश यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे रखवाले तून अपहरण केले आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहेअशी फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४६/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.व्ही.एन.कोकाटे हे करित आहेत.या घटनेने कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close