जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध वाळू उपसा,कोपरगावात दोघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा करण्यास नगर जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध केलेला असतानाही माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत आज दुपारी ०३ वाजेच्या सुमारास आरोपी सोन्या फकिरा पवार (वय-२५) व देवराम कोळपे (पूर्ण नाव माहिती नाही) यां दोन आरोपीनी आपल्या स्वराज कम्पणीचा ट्रॅक्टरच्या सहाय्याने एक ब्रास वाळू उपसा करून ते बेकायदा वाहतूक करताना आढळून आल्याने कोपरगाव तालुका पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.

गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात तत्कालीन खा.काळे यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.अशाच घटना वारंवार घडत आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात तत्कालीन खा.काळे यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते त्यांचे युवराज यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी (?) दाखवून दिली आहे.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.अशीच घटना नुकतीच घडली असून माहेगाव देशमुख येथे आज दुपारी तीन वाजता कोळगाव थडी या गावातील आरोपी सोन्या फकिरा पवार (वय-२५) व देवराम कोळपे (पूर्ण नाव माहिती नाही) यां दोन आरोपीनी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वराज कम्पणीचा ट्रॅक्टरच्या सहाय्याने माहेगाव देशमुख जिल्हा परिषद शाळेसमोरून एक ब्रास वाळू चोरी व उपसा करून ते बेकायदा वाहतूक करताना आढळून आले आहे.त्यांच्याकडुन एक हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू,०२ लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर असा ०२ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.पोलिसानी या दोन्ही आरोपीना अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस कॉ.आबासाहेब रामकृष्ण वाखुरे यांनी त्यांच्यावर गुन्हा क्रं.३२/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे दाखल केला आहे.त्यामुळे वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close