शैक्षणिक
कोपरगावातील..या विद्यार्थ्याने मिळवले जिल्हास्तरीय यश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्हा रुग्णालयाच्या एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय युवा दिनसाजरा करण्यात आला असून त्या निमित्त”उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एड्स संक्रमणाचे मार्ग याविषयी शिक्षण देणे योग्य की अयोग्य “या विषयावर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा आयोग केल्या होत्या त्यात के.जे.सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेंद्र निलेश मुळे यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
“मुळे योगेंद्र हा बीड येथील एका सामान्य परिवारातील विद्यार्थी असून आमच्या महाविद्यालयातील वसतिगृहात राहून तो विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षण घेत आहे.अभ्यासाबरोबरच वक्तृत्व,वादविवाद व वाङमय मंडळातील विविध उपक्रमामध्ये सतत सहभागी होऊन आपल्या कलागुणांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालत आहे”-डॉ.बी.एस.यादव,प्राचार्य के.जे.सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव.
या पारितोषिकाचे स्वरूप रु.०२ हजार व प्रशस्तीपत्र असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे.
सदर प्रसंगी ते पुढे म्हणाले की,”मुळे योगेंद्र हा बीड येथील एका सामान्य परिवारातील विद्यार्थी असून आमच्या महाविद्यालयातील वसतिगृहात राहून तो विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षण घेत आहे.अभ्यासाबरोबरच वक्तृत्व,वादविवाद व वाङमय मंडळातील विविध उपक्रमामध्ये सतत सहभागी होऊन आपल्या कलागुणांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालत आहे.त्याच्या या यशाबद्दल योगेंद्र मुळे यास वाङमय व वादविवाद मंडळाचे प्रमुख प्रोफेसर डॉ.जिभाऊ मोरे,डॉ गणेश देशमुख यांनीं त्याचे अभिनंदन केले आहे.