जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार,ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या ब्रिजलाल नगर येथील आरोपीने (वय-२७) त्याच भागातील शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी (वय-१७) हिच्यावर मागील पाच ते सहा महिण्यापासून शिर्डी येथील राज लॉज येथे तिच्या मनाविरुद्ध अत्याचार करून तिच्यावर जातीवाचक टिपणी केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने कोपरगाव व शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरंगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील रहिवासी असून त्याच भागातील आरोपी असलेला तरुणाने तिला आपल्या मारुती स्विफ्ट या कार (क्रं.एम.एच.१२ जे.यू.९२११) मधून शिर्डी व इतर ठिकाणी नेऊन त्या त्या ठिकाणी वेळोवेळी नेऊन तेथील राज लॉज येथे नेऊन तिचे मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन तिच्यावर जातीवाचक शिक्कामारून तिच्या जातीचा तिच्या वर्तनाशी संबध जोडून उल्लेख करून तिने कोणाला काही सांगितले तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे हे प्रकरण वाढले आहे.दरम्यान या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी अल्पवयीन मुलगी हि कोपरंगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील रहिवासी असून त्याच भागातील आरोपी असलेला तरुणाने तिला आपल्या मारुती स्विफ्ट या कार (क्रं.एम.एच.१२ जे.यू.९२११) मधून शिर्डी व इतर ठिकाणी नेऊन त्या त्या ठिकाणी वेळोवेळी नेऊन तेथील राज लॉज येथे नेऊन तिचे मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन तिच्यावर जातीवाचक शिक्कामारून तिच्या जातीचा तिच्या वर्तनाशी संबध जोडून उल्लेख करून तिने कोणाला काही सांगितले तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.या संबंधी तिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून कार्यवाही सुरु केली आहे.गुन्हा रात्री उशिरा ०८.४१ वाजता दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१४ /२०२२ भा.द.वि.कलम ३७६,५०६,पोक्सो कायदा कलम ४,८,१२ तसेच अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१) आर.एस.डब्ल्यू.प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close