जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मराठी माणसाचा स्वाभिमान टिकवण्याचे काम सेना प्रमुख ठाकरे यांनी केले-प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्रात उद्योग होते पण मराठी तरुण बेरोजगार होता.महाराष्ट्रात पैसा होता पण मराठी माणूस गरीब राहिला होता.महाराष्ट्राला भारतात मान होता पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईत अपमानित होत होता म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना स्थापन करून मराठी माणसाचा स्वाभिमान शाबूत ठेवण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी कोपरगाव शहरात नुकतेच एका कार्यक्रमात केले आहे.

कोपरगाव शहरात युवती सेनेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गोरगरिबांना उबदार कपडे साईबाबा काँर्नर,दत्तपार आदी ठिकाणी वाटप करण्यात आले आहे.युवती सेनेच्या वतिने युवतींना रोजगार मिळावा यासाठी बुटी पाँर्लरचे एक महिण्याचे प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्त्यां युवती सेनेच्या जिल्हा अधिकारी स्नेहा लुंड,कल्पना वैद्य युवती सेना उप अधिकारी श्रीरामपुर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कोपरगाव शहरात शहर शिवसेनेच्या वतीने सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती विविध उपक्रम राबवीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव शहरात उत्तर अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,कोपरगाव संपर्कप्रमुख उदय दळवी,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,माजी शहरप्रमुख भरत मोरे,शहरप्रमुख कलविंदर दडियाल,राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल गंगुले,मावळते नगरसेवक विरेन बोरावके,रमेश गवळी,वाल्मीक लहिरे,फकिर शेख,महेमुद सय्यद,दिनार कुदळे,कोपरगाव विधानसभा संघटक अस्लम शेख,ज्येष्ठ शिवसैनिक राजु डागा,अरविंद सावजी,पोपट झुरळे,मकरंद जोशी,सोनवणे मामा,सोमनाथ शिंगाडे,एस.बी.वाणी,राष्ट्रीय स्वयं संघाचे अमित जैन,भागवत सर,निकम सर,टेकचंद खुबाणी,विक्रांत झावरे आदि शिवसैनिक नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी बहु संख्येने उपस्थित होते

यावेळी अक्षिता आमले अनिता वायखिंडे,शितल चव्हाण,अमृता राऊत,पूजा शर्मा,आरती कौर,प्रीती कोपरे,गौरी सांळुके,सुकन्या आमले,स्नेहल कुडके,कोमल कुडके,आरती बावरकर,तनवी कुवर उपस्थित होत्या.शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे कोठारी हॉस्पिटल-आर्थोपेडिक इन्टेसिव्ह केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरपालिकेतील आरोग्यसेवक व कर्मचार्यासाठी मोफत आरोग्य शिबीर दि.२३ जानेवारी रोजी संपन्न झाले आहे.या शिबिरात बहु संख्येने कर्मचारी बांधवांची तपासणी करण्यात आली आहे.शहरात यावेळी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

स्वराज्य सेना शाखा क्र ५ च्या वतिने भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबिर संपन्न झाले असुन चारशे नागरिकांची तपासणी यावेळी करण्यात आली आहे.शहरात धारणगाव रोड येथे शिवनेरी शाखेचे भव्यदिव्य उदघाटन करण्यात आले आहे.

मधुकर पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.गांधीनगर परिसरात राजे प्रतिष्ठानच्या वतिने भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न झाली आहे.शहरात हनुमाननगर,गांधीनगर रोड,धारणगाव रोड,बस स्थानक परिसर,तसेच शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे पताके लावुन बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी झाली आहे.
उपस्थितांनाचे आभार माजी शहर प्रमुख व एस.टी.कर्मचारी सेनेचे संघटक भरत मोरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close