जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शिर्डीतील इसमाचा कोपरगावात मृत्यू,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील शिर्डी येथील तळेकर वस्ती येथील रहिवासी इसम संपत सोपान पगार (वय-५०) हा आपल्या घरी काही एक कारण न सांगता दि.०६ जानेवारी रोजी घरातून निघून गेला होता.त्याचा शोध घेत असता तो दि.०९ जानेवारी रोजी गोदावरी नदी पात्रात मोठ्या पुलाजवळ आढळून आला आहे. या प्रकरणी खबर देणार मयूर संपत पगार (वय-२२) याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी त्या मृतदेहास काही आपत्कालीन पथकाच्या काही पोहणाऱ्या इसमाच्या सहाय्याने बाहेर काढले असता तो मृतदेह हा शिर्डी येथील गायब इसम संपत पगार यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल करून शिर्डी येथे रवाना करण्यात आला होता.मात्र तेथील पोलीस ठाण्याने तो उलट टपाली पाठवला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत संपत पगार हा प्रारंभी शिर्डी येथील कोणालाही काही न सांगता शिर्डी येथील घरी काही न सांगता बाहेर पडला होता.त्याचा जवळच्या नातेवाईकांनी शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता.अखेर ते शोध घेत-घेत कोपरगाव येथील गोदावरी नदीवर नगर-मनमाड महामार्गावर बांधण्यात आलेल्या पुलावर आले असता त्या ठिकाणी त्यांना एका इसमाचा मृत देह पाण्यात तरंगताना आढळून आला होता.त्याची खबर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी त्या मृतदेहास काही आपत्कालीन पथकाच्या काही पोहणाऱ्या इसमाच्या सहाय्याने बाहेर काढले असता तो मृतदेह हा शिर्डी येथील गायब इसम संपत पगार यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल करून शिर्डी येथे रवाना करण्यात आला होता.मात्र तेथील पोलीस ठाण्याने तो उलट टपाली पाठवला आहे.त्यामुळे तो कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करून घेतला आहे.या घटनेने शिर्डी व कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळ कोपरगाव शहर पोलीस ठाणे असताना तो कोणत्या आधारावर शिर्डी पोलीस ठाण्यात पाठवला होता.हे समजायला मार्ग नाही.याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०६/२०२२ अन्वये खबर देणार मयूर संपत पगार यांचे खबरो वरून दाखल करून घेतला आहे.पुढील ताप्पास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close