जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ट्रकचा अपघात करून ट्रक जाळली,कोपरगावात आरोपीवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-संवत्सर (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदीचे पुढे आज पहाटे १.४० वाजेच्या सुमारास ट्रक वरील आरोपी चालक किसन साहेबराव वाघ याने आपल्या ताब्यातील लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक (क्रं.एम.एच.२०,सी.टी.२३५५) हा हयगईने भरधाव वेगाने चालवून,रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून अपघात करून गाडी रोडचे खाली जाऊन आग लावून सदर गाडीचे नुकसान केल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नाशिक येथील फिर्यादी मालक बाळासाहेब बारकू गांगुर्डे (वय-४९) यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

आरोपी चालक किसन वाघ याने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचा टाटा ट्रक हा पाईपणे भरलेला होता.तो घेऊन सिन्नर वरून औरंगाबादच्या दिशेने मध्यरात्री नंतर पावणे दोनच्या सुमारास घेऊन जात असताना संवत्सर शिवारात रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून त्याच्या ताब्यातील वरील क्रमांकाचा टाटा कंपनीचा बारा चाकी लोखंडी पाईपचा ट्रक हा पल्टी केला आहे.व ट्रक रॉडचे खाली नेऊन तिला आग लावून गाडीचे नुकसान केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,आरोपी चालक किसन वाघ याने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचा टाटा ट्रक हा पाईपणे भरलेला होता.तो घेऊन सिन्नर वरून औरंगाबादच्या दिशेने मध्यरात्री नंतर पावणे दोनच्या सुमारास घेऊन जात असताना संवत्सर शिवारात रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून त्याच्या ताब्यातील वरील क्रमांकाचा टाटा कंपनीचा बारा चाकी लोखंडी पाईपचा ट्रक हा पल्टी केला आहे.व ट्रक रॉडचे खाली नेऊन तिला आग लावून गाडीचे नुकसान केले आहे.

हि खबर संबंधित ट्रक मालकास कळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर ठिकाणी जाऊन निरीक्षण केले असता सदरचा गुन्हा हा चालकाने हा जाणीवपूर्वक केला असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.व आज दुपारी ०२.३३ वाजेच्यास सुमारास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड आदींनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली असून गुन्हा क्रं.०७/२०२२ भा.द.वि.कलम २७९,४२७,व मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close