जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

रात्रीच्या सुमारास रस्ता लूट,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत दि.२८ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पोहेगाव-सोनेवाडी रस्त्यावर त्याच गावातील आरोपी सुरेश नामदेव वायकर याने आपण सोनेवाडीकडे आपल्या दुचाकीवरून जात असताना आपल्या हातावर लाकडी काठीच्या सहाय्याने जोराचा फटका मारून आपल्याला अडथळा आणला गाडीस अडथळा आणल्यावर आपण खाली उतरत असताना आरोपीने पाठीवर,पायावर लाकडी काठीने मारहाण करून आपल्याला दुखापत करून आपल्याकडील पाचशे दाराच्या नोटा असलेली रोख रक्कम ३५ हजार रुपये बळजबरीने चोरून नेले असल्याचा गुन्हा त्याच गावातील फिर्यादी चंद्रकांत बाबुराव मंजुळे (वय-५४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी चंद्रकांत मंजुळे हे आपले काम आटोपून आपल्या घरी जात असताना रस्तालुटीसाठी दबा धरून बसलेला आरोपी सुरेश वायकर याने फिर्यादीची दुचाकी त्यास काठी मारून अडवली,त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.त्यानी रात्री कसेबसे घरी जाऊन काल दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव पोलीस ठाणे गाठले व आरोपीस त्यांनी ओळखले असल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुक्यात पोलीस निरीक्षक पदी दौलतराव जाधव हे आल्या पासून रस्ता लुटीच्या घटनात कमी आली असली तरी त्या पूर्णपणे बंद झालेल्या नाही.रस्ता लूट करणाऱ्या आरोपीनी आपला हात दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना सोनेवाडी शिवारात नुकतीच रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.फिर्यादी चंद्रकांत मंजुळे हे आपले काम आटोपून आपल्या घरी जात असताना रस्तालुटीसाठी दबा धरून बसलेला आरोपी सुरेश वायकर याने फिर्यादीची दुचाकी त्यास काठी मारून अडवली. त्यांनी आपल्या गाडीचा वेग कमी करून खाली उतरण्यास भाग पाडल्यावर त्यांना अंगावर पाठीवर पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.

त्यानी रात्री कसेबसे घरी जाऊन काल दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव पोलीस ठाणे गाठले व आरोपीस त्यांनी ओळखले असल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य समजून घेतले आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४०५/२०२१ भा.द.वि.कायदा कलम ३९४ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.या घटनेने सोनेवाडी-पोहेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close