जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात अवैध गोवंश वाहतूक,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.०३ ऑक्टोबरच्या रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास धारणगाव रस्त्यावरील नागरे पेट्रोल पंपासमोर मिळालेल्या खबरीनुसार पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सिन्नर तालुक्यातील दहिवाडी येथील आरोपी राजेंद्र भट्टू तारगे (वय-५०) हा आपल्या ताब्यातील २.५० लाख रुपये किमतीचा महिंद्रा मॅक्स पिकअप (क्रं.एम.एच.१५ बी.जे.१३९५) द्वारे चार जनावरे घेऊन जात असताना पोलिसांनी प्रत्येकी १० हजार रुपये किमतीच्या ०२ गायी,एक ०७ हजार रुपये किमतीची म्हैस,व ०५ हजार रुपये किमतीचा रेडा असा एकूण किंमत ०२ लाख ८२ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असून त्यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

संकल्पित छायाचित्र

मागील सप्ताहात अशीच घटना अपना बेकरी समोर उघड झाली होती.त्यात सुमारे अडीच लाखाहून अधिक ऐवज जप्त करण्यात आला होता.या घटनेला आठवडा उलटला नाही तोच काल संगमनेर येथे मोठा ऐवज जप्त केला असताना दि.०३ ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाल्यावर पोलिसांनी धारणगाव रोडवर नागरे पेट्रोल पंपावर सापळा लावला असता त्या ठिकाणी हे सावज अलगत त्यांचा ताब्यात मिळाले आहे.त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

राज्यात २०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.१९७६ च्या व आता अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत.आधीच्या कायद्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता.या कायद्यात गाईबरोबर बैलाचा व वळूचा समावेश करण्यात आला.म्हणजे गोवंश हत्याबंदी करण्यात आली.हा कायदा एवढय़ावरच थांबत नाही,तर आणखी काही कडक व कठोर र्निबध लादले आहेत.गाय,बैल,वळू यांची कत्तल करता येणार नाही,त्या हेतूने त्यांची खरेदी,विक्री करता येणार नाही,विल्हेवाट लावता येणार नाही.गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.बाहेरील राज्यात कत्तल केलेली गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.म्हणजेच एक प्रकारे गाय,बैल,वळू यांचे मांस सेवन करण्यासच प्रतिबंध करण्यात आला आहे.हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आला असतानाही राज्यात सर्रास या प्राण्यांची कत्तल सुरु आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.संगमनेर येथे मुंबईतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोवंश जप्त करून दिला असताना कोपरगाव शहरात हि मोठी उपलब्धी झाली आहे.

कोपरगावात गत दोन वर्षांपूर्वी ऐन शिवरात्रीच्या दिवशी नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मोठी धाड टाकून संजयनगर येथील मोठे गोवंश हत्तेचे रॅकेट उघड केले होते.त्या नंतरही त्याचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे.स्वतंत्र कत्तलखाना उभारूनही त्याचा उपयोग केला जात नाही,स्वतः नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या बाबी वारंवार उघड करूनही त्याला पोलिसांना थांबवता आले नाही.त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मागील सप्ताहात अशीच घटना अपना बेकरी समोर उघड झाली होती.त्यात सुमारे अडीच लाखाहून अधिक ऐवज जप्त करण्यात आला होता.या घटनेला आठवडा उलटला नाही तोच दि.०३ ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाल्यावर पोलिसांनी धारणगाव रोडवर नागरे पेट्रोल पंपावर सापळा लावला असता त्या ठिकाणी हे सावज अलगत त्यांचा ताब्यात मिळाले आहे.त्यात ०२ मोठ्या गायी व ०१ म्हैस व ०१ असा एकूण ०४ गोवंश जनावरे जप्त केले आहे.त्यांची बाजारातील आजची किंमत ३२ हजार इतकी तर जप्त केलेला महिंद्रा पिकअपची किंमत २.५० लाख अशी एकूण ०२ लाख ८२ हजारांचा अवैज जप्त केला आहे.शहर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी आरोपी विरुद्ध पो.कॉ.जालिंदर पुंजा तमनर यांनी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.क्रं.३०४/२०२१ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ११(२) (अ),(ब),(ई)(फ)पशु वाहतूक अधिनियम (७४)मोटार वाहन कायदा कलम ८३,८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close