कोपरगाव तालुका
कोकणवासियांना कोपरगाव तालुका मराठा उद्योजक संघाकडून मदत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोकणवासीयांना अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराच्या संकटात एक मदतीचा हात म्हणून मराठा उद्योजक संघटना यांनी जीवनावश्यक वस्तू,किराणा व इतर दैनंदिन वापरातील आठ दिवस पुरेल इतके साहित्याचे संच तयार करून वितरणासाठी श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथून रवाना करण्यात आले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोकण महापुरात अडकल्या नागरिकांना मदत मिळणे गरजेचे होते.हि गरज ओळखून कोपरगाव येथील मराठा उद्योजक संघटनेने पुढाकार घेतला घेत जीवनावश्यक वस्तू सर्व सामग्री एकत्रित संकलित करून दि.४ ऑगस्ट रोजी श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथून जिल्हा बँकेचे संचालक,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या शुभहस्ते मदत कार्य वाहनांची पूजा करून व श्रीफळ वाढवून सदर वाहन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले आहे.
रत्नागिरी,रायगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने महाड,चिपळूण,खेड,संगमेश्वर,राजापूरमध्ये महापूर आल्याने हाहा:कार उडाला आहे.महामार्ग व कोकण रेल्वे बंद पडल्याने कोकण ठप्प झाले होते.महाड,चिपळूण पाण्याखाली गेले असताना हजारो लोक आपल्या घरात अडकून पडले होते. त्यांच्या बचावासाठी पुणेवरून चिपळूणकडे जाणार्या एनडीआरएफच्या टीम देखील कोयनेत अडकल्या होत्या एवढे या महापुराचे उग्र स्वरूप होते.नवजा मार्गावर दरड आणि झाड पडल्याने टीम अडकून पडली होत्या.अखेर राज्य शासनाने बचावासाठी दोन हॅलिकॉप्टरची व्यवस्था केली होती.त्यामुळे या महापुरात अडकल्या नागरिकांना मदत मिळणे गरजेचे होते.हि गरज ओळखून कोपरगाव येथील मराठा उद्योजक संघटनेने पुढाकार घेतला घेत जीवनावश्यक वस्तू सर्व सामग्री एकत्रित संकलित करून दि.४ ऑगस्ट रोजी श्री साईबाबा तपोभूमी मंदिर येथून जिल्हा बँकेचे संचालक,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या शुभहस्ते मदत कार्य वाहनांची पूजा करून व श्रीफळ वाढवून सदर वाहन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले.
यावेळी मराठा उद्योजक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुटे,जिल्हा संपर्कप्रमुख राहुल आढाव,जिल्हा महिला सहसंपर्कप्रमुख रविजा पिंगळे,बाळासाहेब देवकर,वैभव आढाव यांचेसह मराठा उद्योजक संघाचे सदस्य उपस्थित होते.कोपरगांव तालुक्यातील मराठा उद्योजक संघाने माणुसकीला जागून एकत्र येऊन दिलेल्या मदतीचे कौतुक होत आहे.
तसेच माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील बोलताना म्हणाले की,”कठीण प्रसंगातून घेऊ उभारी कारण आमचे आदर्श राजे शिवछत्रपती या वाक्याप्रमाणे आज शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कोरोना मुळे झालेल्या लॉकडाऊनच्या कठीण काळातही पूरग्रस्त भागातील संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी मराठा उद्योजक संघांने ही मदत गोळा करूनहा उपक्रम राबवला आहे.
यासाठी कोपरगाव तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातून सहकार्यासाठी अनेक हात पुढे आले आहे.त्यासाठी सदस्य सुशांत आहेर,राहुल गायकवाड,अनिल शिंदे,गणेश गायकवाड,सचिन शेळके,गणेश तुळसकर,विकास देवकर,मुकुंद आहेर,प्रतीक दरेकर,ऋषभ कानस्कर,विशाल गायकवाड,शशिकांत गायकवाड, महेश जवाद, प्रशांत आहेर,कैलास शिंदे,प्रसाद रुईकर,साई नरोडे, प्रतीक पाटील,जाधव सर,संदीप आहेर,अभिजीत सरोदे,कृष्णा आढाव आदींनीं सहकार्य केले आहे.