जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातमोठी चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर काम करत असलेला मात्र वर्तमान स्थितीत उभा असलेला १२ लाख रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा रोलर (क्रं.ए.पी.०३ टि.३९०९) अज्ञात चोरट्याने चांदेकासारे शिवारातून पळवून नेला असल्याचा गुन्हा बाबू जलपती रेड्डी (वय-४२) तेलंगणातील रा.आयता पल्ली ता.पेगडापेल्ली जि.करीमनगर येथील फिर्यादी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.त्यामुळे वाहन चालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

वर्तमानात समृद्धी महामार्गावरील कंपनीकडून सरकारने काम अक्षम्य प्रलंबित केल्याने काढून घेतले आहे.त्यामुळे संबधित ठेकेदार हा आपली यंत्रणा काढून घेत आहे.व ती अन्यत्र विस्थापित करत आहे.त्यांचे कार्यालय चांदेकसारे शिवारात आहे.त्या ठिकाणी सदरचा विजयकुमार रेड्डी यांच्या मालकीचा रोड रोलर हा अज्ञात आरोपीने कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत दि.२९ मे च्या सकाळी ०८ ते १०.३० वाजेच्या दरम्यान उभा असताना तो अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हा समृद्धी महामार्गावर काम करत असलेल्या ‘गायत्री कन्ट्रक्शन’ या ठेकेदाराकडे चालक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे.सध्या या कंपनीकडून सरकारने काम अक्षम्य प्रलंबित केल्याने काढून घेतले आहे.त्यामुळे संबधित ठेकेदार हा आपली यंत्रणा काढून घेत आहे.व ती अन्यत्र विस्थापित करत आहे.त्यांचे कार्यालय चांदेकसारे शिवारात आहे.त्या ठिकाणी सदरचा विजयकुमार रेड्डी यांच्या मालकीचा रोड रोलर हा अज्ञात आरोपीने कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत दि.२९ मे च्या सकाळी ०८ ते १०.३० वाजेच्या दरम्यान उभा असताना तो अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेला आहे.सदरचा गुन्हा फिर्यादी यांनी शोध घेऊनही सदरचा रोलर मिळून न आल्याने रात्री १.१२ वाजता गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२२०/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close