गुन्हे विषयक
जमिनीतून गेल्याचा राग,शेतकऱ्यास मारहाण,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत शिवारातील जमिनीतून गेल्याचा राग मनात धरून आरोपी अशोक तुकाराम जामदार व त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांनी फिर्यादी कैलास सखाराम जामदार यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले आहे व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे धोत्रे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीचे शेत गट क्रं.२६८ असून ते दि.रविवार दि.१३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतातील घरासमोर असताना आरोपी कैलास जामदार व अन्य तीन आरोपीनी फिर्यादी हे त्यांच्या शेतातून गेल्याचा राग मनात धरून आरोपी अशोक जामदार याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादिस मारहाण केली आहे.तर अन्य आरोपीनीं फिर्यादी कैलास जामदार यांना धक्काबुक्की करून फिर्यादिस वाईट साईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी कैलास जामदार हे धोत्रे येथील तर आरोपी अशोक जामदार,तुकाराम जयराम जामदार,भीमाबाई तुकाराम जामदार,मीना अशोक जामदार,आदी हे मुर्शतपुर येथील रहिवासी असून फिर्यादीचे शेत गट क्रं.२६८ असून ते दि.रविवार दि.१३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतातील घरासमोर असताना आरोपी कैलास जामदार,अशोक जामदार,भीमाबाई जामदार,मिनाबाई जामदार आदिनी फिर्यादी हे त्यांच्या शेतातून गेल्याचा राग मनात धरून आरोपी अशोक जामदार याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादिस मारहाण केली आहे.तर आरोपी अशोक जामदार,तुकाराम जामदार,भीमाबाई जामदार,मिनाबाई जामदार आदींनी फिर्यादी कैलास जामदार यांना धक्काबुक्की करून फिर्यादिस वाईट साईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादी कैलास जामदार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस नाईक सी.बी.कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४५०/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नाईक काळे हे करित आहेत.