गुन्हे विषयक
विवाहित महिलेचा भायाकडून विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या महिला (वय-३८) हिचा घराची भिंत फोडून सांडपाणी घराचे दारात काढल्याचा कारणावरून फिर्यादी महिलेचा सासरा,सासू,यांनी महिलेला विट फेकून मारली व फिर्यादी व फिर्यादीचा पतीस लाथाबुक्यांनी मारहाण करून महिलेच्या भायाकडून महिलेला मागील बाजूस कवळी मारून विनयभंग केला असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
चासनळी येथील रहिवाशी असून ती आपल्या सासू-सासरे यांच्यातून विभक्त शेजारीच आपला पती व आपल्या कुटुंबासमवेत रहाते.या माहिलेने तिच्या घराचे सांडपाणी हे शेजारी रहात असलेल्या सासू-सासऱ्याच्या अंगणात भिंत फोडून काढल्याने या भांडणाची सुरुवात झाली.त्यातून हे भांडण विकोपाला गेले आहे.त्यातून हा प्रकार घडला गेल्याचे महिलेचे म्हणणे आहे.या बाबत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि चासनळी येथील रहिवाशी असून ती आपल्या सासू-सासरे यांच्यातून विभक्त शेजारीच आपला पती व आपल्या कुटुंबासमवेत रहाते.तर एक भाया दूर चारीनजीक राहतो.या माहिलेने तिच्या घराचे सांडपाणी हे शेजारी रहात असलेल्या सासू-सासऱ्याच्या अंगणात भिंत फोडून काढल्याने या भांडणाची सुरुवात झाली.त्यातून हे भांडण विकोपाला गेले आहे.त्यात शनिवार दि.१० जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास व दि.११ जुलै रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास फिर्यादीचे घरी हे भांडण घडले असल्याचे फियादी महिलेने म्हटले आहे.हे भांडण इतके विकोपाला गेले की आपल्या घराच्या इज्जतीचे भान त्या महिलेच्या भाया याला राहिले नाही.आधी या महिलेला सासू -सासऱ्यांनी विट फेकून मारली व त्या नंतर फिर्यादी महिला व तिच्या पतीस लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.इथपर्यंत हे भांडण थांबले नाही तर फिर्यादीच्या भाया याने मर्यादेचे भान सोडून कहर केला व या महिलेच्या मागून होऊन तिचा विनयभंग केला असल्याची फिर्याद त्या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात केली आहे.या शिवाय सासरे यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून नेल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.त्या बाबत चासनळी व परिसर व तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान …या महिलेची पार्श्वभूमी हि भांडणाची असून या पूर्वीही पोलीस अधिकारी व ग्रामस्थांनी अनेक वेळा समझोते केलेले असून काही गुन्हे दाखले झालेले असून यातील प्रमुख आरोपीने कंटाळून विष प्राशन केले होते.त्यातून नाशिक येथे उपचार करून कसेबसे वाचलेले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.क्रं.२६६/२०२१ भा.द.वि.कलम ३५४,३२४,३२७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी सासरे,सासू,भाया आदी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.