जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

घराच्या अंगणात कचरा टाकल्याच्या कारणावरून एकास मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील तीनचारी परिसरात राहणाऱ्या महिला इंदूबाई भिकाजी इजगे (वय 70 ) यांनी आपल्या घराच्या अंगणात कचरा का टाकला असे विचारल्याचा राग येऊन घराशेजारी राहाणारा आरोपी अन्सार तरीम शहा याने आपल्याला लाकडी काठीने डोक्यात मारहाण करून गंबिर दुखापत केल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेने दाखल केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला इंदूबाई इजगे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी गु.र.नं. 349/2019 भा.द.वि.कलम 342,504,506 अन्वये आरोपी अन्सार शहा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मांनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दारकुंडे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close