जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध वाळू चोरी प्रकरणात कोपरगावात पोलिसांनी पिकअप केली जेरबंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात मध्यरात्रीच्या सुमारास एक टाटा कंपनीचा झेनॉन पिकअप (क्रं. एम.एच.04 एफ.यू.7486 )हा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची परवानगी न घेताच अवैध वाळू चोरी करताना आढळून आल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी या रिक्षाला थांबविले असता रिक्षाचालक आपली वाहतूक रिक्षा सोडून पळून गेला आहे.

नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पो.कॉ.विनोद शिवाजी मासाळकर यांच्या माध्यमातून या प्रकरणी अज्ञात रिक्षा चालका विरुद्ध गु.र.नं.352/2019,भा.द.वि 379,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचा पिकअप,दहा हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू,असा एकून चार लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डि. आर.तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close