जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रस्थापितांकडे मतदारांना पैठण्या वाटण्यासाठी पैसे कोठून आले-विजय वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव (प्रतिनिधी )आगामी निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पैठण्या वाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे एवढा प्रचंड पैसा कोठून आला असा कडवा सवाल कोपरगाव नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी काल एका कार्यक्रमात आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता विचारला आहे.राज्यातील 288 जागांसह कोपरगाव विधानसभा मतदारसंघांची निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी सपत्नीक आपल्या प्रचाराचा नारळ कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर मंदिरात फोडला त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ भाजप नेते रामदास खैरे हे होते.

कोपरगाव तालुक्यात बसचे शेड व स्मशानशेड गावोगावी उभारण्यात आले आहे.मात्र त्यातही खरा खर्च चाळीस हजार व नव्वद हजार आला असताना या पुढाऱ्यांनी त्यात सव्वा लाख व साडे तीन लाखांची मलई पेव्हर ब्लॉकसह लाटली असल्याचा गौप्यस्फोटही वहाडणे यांनी आपल्या भाषणात केल्याने खळबळ उडाली आहे.व या बस शेडमध्ये कोंबड्याही बसू शकत नाही.अशी टीका केली आहे.

सदर प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते टेकचंद खुबाणी,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी,प्रा.सुभाष शिंदे,माजी तालुकाध्यक्ष वाल्मीकराव भोकरे,नामदेवराव जाधव,शेतकरी संघटनेचे नेते रुपेंद्र काले, किसान संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब गाढवे,बाजार समितीचे संचालक सुधाकर गाढवे,माजी नगरसेवक संजय कांबळे,वेसचे माजी सरपंच माणिक दिघे,बापूराव बारहाते,योगेश वाणी,नवनाथ जाधव,सादिक शेख, उमाताई वहाडणे,किरण थोरात,शंकर सिनगर,आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

रुपेंद्र काले यांनी आपल्या भाषणात कोपरगाव शहराला निळवंडेच्या पाण्याची गरजच नाही.मात्र हा केवळ मतांसाठी उभा केलेला बागुलबुवा आहे.कोपरगाव पालिका जलसंपदाकडून आहे ते मंजूर पाणी पन्नास टक्केही उचलत नसतांना बाकी पाणी जाते कुठे याचा कोपरगाव शहरवासीयांनी शोध घेण्याची गरज असल्याचे तेथे खरे गुपित दडले आहे असे सांगून यांनी या पूर्वी शहरातील विस्थापित,उजनी चारी,निळवंडे धरण यावर मतांची लयलूट करुण जनतेला वेड्यात काढले असल्याचे बजावून मतदारांना सावध होण्याचा इशारा दिला.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,तालुक्याच्या विकासाच्या नावाने बोंबा मारताना थोडीशी तरी जणांची नाही तरी मनाची लाज बाळगण्याची आवश्यकता आहे.मात्र प्रस्थापितांनी या बाबत कुठलाही विधिनिषेध बाळगलेला दिसत नाही.गत पन्नासवर्षात तालुक्यात यांचीच सत्ता आलटून पालटून असताना विकास नेमका कोणी करायला हवा होता.ज्यांनी विकास करायला हवा होता तेच आज दांभिकपणा करून शिल्लक न ठेवलेल्या विरोधकांच्या नावाने खडे फोडत आहे व उरबडवेपणा करून जनतेच्या डोळ्यात दिवस धूळफेक करीत आहे.तालुक्याचे सिंचनाचे पाणी कोणी घालवले,उजनी चारीचे व निळवंडे कालव्यांची खोटी उदघाटने कोणी केली ? तालुक्यात औद्योगिक वसाहत यांनी रोजगार निर्मितीसाठी का आणली नाही.याला यांना कोण आडवे आले होते हे यांनी स्पष्ट सांगावे.मात्र यांच्याकडे कुठलेही उत्तर नसल्याने ते साप-साप म्हणून भुई बडवत आहेत.आपण या बाबत मुंबईत जाऊन उद्योग मंत्र्यांची भेट घेतल्यावर यांना जाग आल्याचे यांनी सोंग केले.वास्तविक तो पर्यंत उद्योग मंत्र्यांनी या बाबत जागा पाहणीचे अहवाल देण्याचे फर्मान सोडले होते.त्यामुळेच यांच्या पोटात गोळे उठले होते.यांनी कुक्कुट पालन सहकारी संस्थांच्या जमिनी हडप केल्या सहकार नावालाच ठेवला व स्वाहाकार केला यांना आमच्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही.सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभा एकाच वेळी व एकाच दिवशी घेण्याचे यांचे प्रयोजन काय ?

आधी आमचे कमळ हिसकावले त्या नंतर आम्हाला आमच्याच पक्षातून हुसकावले व आमच्याच पक्षावर कब्जा केला आता पाच वर्षांपासून जनतेची लूट सुरु केली.निळवंडेच्या पाण्याची शुद्ध थाप आहे त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये-वाल्मिकराव भोकरे

याचाच अर्थ सभासदांना त्यांचे हक्क भविष्यात नाकारण्यात येणार असून त्याना मालकी हक्कापासून वंचित ठेवण्यात येणार आहे असा आरोपही त्यानी केला आहे.पाच क्रमांकाच्या तलावाला आ. स्नेहलता कोल्हे यांनींच अडचण आणल्याचे त्यांनी शपथेवर सांगितले.व आपण यांच्या सर्व कारभाराचा आगामी काळात भांडाफोड करणार आहोत.या वेळी त्यांनी वाळूचे हप्ते कोणाच्या खिशात जातात याचा जाब विचारला आहे.यांच्या कुटुंबीयांकडे एवढ्या उंची गाड्या कोणाच्या पैशातून आल्या आहेत.असा सवाल विचारून आपण विस्थापितांना त्याना सन्मानाने खोका शॉप देणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.सदर प्रसंगी प्रा.सुभाष शिंदे शेतकरी संघटनेचे नेते रुपेंद्र काले, वाल्मिक राव भोकरे,टेकचंद खुबाणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मोदी मंचचे अध्यक्ष सुभाष दवंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close