कोपरगाव तालुका
कोपरगावात कोरोना प्रतिबंध लसीकरणाची सुरुवात…
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा शुभारंभ ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.त्यावेळी सर्व प्रथम विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे यांनी पहिली लस घेऊन त्याची सुरुवात केली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी देशाला संबोधित केल्यानंतर संपूर्ण देशात लसीकरण सुरू झालं आहे.आज लसीकरण मोहिमेच्या तिसरा दिवस आहे.कोपरगावतही आज या लसीचा शुभारंभ करण्यात आला आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशाला संबोधित केल्यानंतर संपूर्ण देशात लसीकरण सुरू झालं आहे.आज लसीकरण मोहिमेच्या तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी काय झालं ? याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.करोनावर आतापर्यंत सोळा लाख जणांना लस देण्यात आली.यापैकी केवळ ४४७ जणांना साइड इफेक्ट झाल्याचं नोंदवले गेले आहे,असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.जगात सर्वाधिक लसीकरण भारतात झालं आहे. एका दिवसात २,०७, २२९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सपेक्षा ही संख्या जास्त आहे.
कोपरगांव तालुक्यातील लसीकरण प्रारंभ ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे करण्यात आला आहे.तहसिलदार योगेश चंद्रे,भारतीय वैद्यकीय संघटना कोपरगाव शाखा अध्यक्ष डॉ.महेंद्र गोंधळी यांचे प्रमुख उपस्थितीत धन्वंतरी पूजन व फित कापून कोरोना लसीकरण दालणाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोना निर्मुलनासाठी विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली आव्हाड(बडदे) यांना ग्रामिण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांचे हस्ते पहिली लस देण्यात आली.
या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, डॉ.अजेय गर्जे, डॉ.विजय क्षीरसागर, डॉ.राजेश माळी,डॉ.गोवर्धन हुसळे,डॉ.बन्सिधर ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध तोडकर, डॉ.आतिष काळे,डॉ.जितेंद्र रणदिवे,डॉ.मेघा गोंधळी,ग्रामिण रुग्णालयाचे डॉ.संदिप वैरागर,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,साथ नियंत्रण अधिकारी सचिन जोशी, घनशाम शिंदे,आरोग्य सेविका नंदू नवले,सपना पठारे,पुनम नेटके,गाणार,जाधव,यांचे सह ग्रामिण रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
लसीकरण नोंदणी,प्राथमिक तपासणी,प्रत्यक्ष लसीकरण, निरीक्षक कक्ष असे स्वतंत्र दालन करण्यात आले आहे.लस घेतलेल्या व्यक्तीचे ३० मिनिट निरीक्षण कक्षात करण्यात येणार आहे.त्यानंतरही एखाद्या व्यक्तीस काही विपरीत परिणाम जाणवू लागल्यास तशी अतिदक्षता व्यवस्था विभाग करण्यात आला आहे.
पहिल्या टप्यात कोपरगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर व त्यांचे कर्मचारी यांना लस देण्यात येत येणार असून दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.
लसीकरण केंद्रावर सुशोभिकरण करण्यात आले असून सेल्फी पाॅईंट उभारण्यात आला आहे.
पहिली लस घेण्याचा मान मिळालेल्या विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली आव्हाड (बडदे) लस घेतल्या नंतर म्हणाल्या,कोरोना प्रतिबंध लस पुर्णपणे सुरक्षित आहे.त्या विषयी अफवा गैरसमज पसरु न देता आत्मविश्वासाने प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.असे सांगितले.
ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे दररोज सकाळी ०९:०० ते दुपारी ०५:०० वाजेपर्यंत लसीचे १०० डोस दिले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी शेवटी दिली आहे.