गुन्हे विषयक
..त्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या,तीन दिवसांची कोठडी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गंगापूर तालुक्यातील देरडा फिर्यादी इसम दीपक कचरू औताडे (वय-३६) यांना दि.३० डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संजयनगर भाजीमार्केट रोडवर अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी शस्राचा धाक दाखवून त्यांच्या कडील रोकड व अन्य ऐवज धरून १० हजार २०० रुपयांची लूटमार करून चोरट्यांनी धूम ठोकली होती त्या आरोपींना शहर पोलिसांनी दोन तासात जेरबंद केले असून त्यात आरोपी अस्लम उमर कुरेशी,(वय-२३),अभिजित संजय साठे,वय-(२०),सोहेल जावेद पठाण वय-(१९) सर्व रा.सुभाषनगर आदींना कोपरगाव शहर पोलिसानी अटक केली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे वेगाने हलवली होती.त्यातून त्यानां गुप्त खबऱ्यामार्फत चोरटे हे सुभाषनगर परिसरातील असल्याची खबर मिळाली होती.पोलिसानी या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले असता त्यांना दि.४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोपरगाव शहरात वर्तमानात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यापासून लुटमारीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली असून या घटनात वारंवारिता वाढली आहे.त्यामुळे नागरिकांत याबाबत भीतीचे वातावरण पसरले होते.अशीच घटना कोपरगावचे उपनगर असलेल्या संजयनगर या परिसरात भाजीपाला मार्केट रोडवर दोन दिवसापूर्वी ३० डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील देरडा येथील रहिवाशी असलेले इसम दीपक औताडे हे प्रवास करत असताना या परिसरात चार ते पाच आरोपींनी त्याना अडवून त्यानां शस्राचा धाक दाखवून,शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी देऊन लाथा बुक्य्यांनी मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ओपो कंपनीचा मोबाईल त्यातील सिमकार्ड व रोख दोनचे रुपयांची रक्कम लांबवली होती.त्यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८६०/२०२० भा.द.वि.कलम ३९७,५०४,५०६,३४ प्रमाणे अज्ञात चार ते पाच आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करून आपली तपासाची सूत्रे वेगाने हलवली होती.त्यातून त्यानां गुप्त खबऱ्यामार्फत चोरटे हे सुभाषनगर परिसरातील असल्याची खबर मिळाली होती.पोलिसानी या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले असता त्यांना दि.४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांच्या या कर्तव्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अन्य आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.