गुन्हे विषयक
ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या सुभाषनगर येथील फिर्यादी किराणा दुकानदार अमीन हारून शेख याने भांडणात चापट मारल्याचा राग येऊन आरोपी मोहसीन मणियार (पूर्ण नाव माहीत नाही) रा.कोपरगाव याने त्याच्यावर दि.२४ डिसेंबर रोजी स्क्रू ड्राइव्हरने थेट मानेवर हल्ला करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी मोहसीन मणियार याला नुकतीच कोपरगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपीस श्रीरामपूर,लासुर, जालना,कसारा,मुंबई,येवला,आदी नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता.दरम्यान फरार आरोपी हा तीस डिसेंबर रोजी कोपरगाव येथील खुले नाट्यगृहाचे पाठीमागे लपून बसला असल्याची खबर मिळाली होती.पोलीसानी तेथे जाऊन सापळा लावला होता.व त्याला शिताफीने अटक केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असर की,”फिर्यादी अमीन शेख याचे कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथे किराणा दुकान आहे.फिर्यादी शेख व त्याचे अन्य चार मित्र हे दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धारणगाव रोडवरील माधव बागेसमोर बसलेले असताना त्यावेळी आरोपी मोहसीन मणियार हा दारू पिऊन त्यांचे जवळ आला व फिर्यादी हारून शेख व त्याचा मित्र शुभम यांना शिवीगाळ करू लागला होता.याचा राग येऊन फिर्यादी याने आरोपीस एक चापट मारली त्याचा आरोपीस राग आला व त्याने हातात स्क्रू ड्रायव्हर घेऊन फिर्यादी अमीन शेख याचे मानेवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता व गुन्हा करून तो फरार झाला होता.त्यात फिर्यादी अमिन शेख हा गंभीर जखमी झाला होता.त्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते.तेथे पोलिसानी त्याचा जबाब नोंदवून पुढील कारवाही सुरु केली होती.व आरोपींचा शोध सुरु केला होता.
पोलिसानी या आरोपीस श्रीरामपूर,लासुर, जालना,कसारा,मुंबई,येवला,आदी नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता.दरम्यान फरार आरोपी हा तीस डिसेंबर रोजी कोपरगाव येथील खुले नाट्यगृहाचे पाठीमागे लपून बसला असल्याची खबर मिळाली होती.पोलीसानी तेथे जाऊन सापळा लावला होता.व त्याला शिताफीने अटक केली आहे.यात शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,पो.कॉ.सूरज अग्रवाल,आर.पी.पुंड.,थोरात,बी.एस.कोरेकर,संभाजी शिंदे,सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे.श्री खारतोडे आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.