जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मोबाईल न दिल्याच्या कारणावरून एकास मारहाण

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवाशी असलेला फिर्यादिस त्याच्या मालकीचा मोबाईल मागितला तो त्याने दिला नाही याचा राग येऊन आरोपी तुषार चव्हाण रा.अंबिका नगर व गणेश लोखंडे रा.कोल्हे वस्ती,येसगाव या दोघांनी आपल्याला लोखंडी रॉडने मारहाण केलीय असल्याचा गुन्हा नितीन विनायक चिटणीस (वय-३५) याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

आपण सकाळी साईबाबा कॉर्नर येथे घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभा असताना त्याच्या जवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन तरुण आले व त्यांनी,”आम्हाला फोन करण्यासाठी तुझा फोन दे”असे म्हणून माझ्या मालकीचा फोन अनाधिकाराने मागितला मात्र आपल्याला त्यांच्या तोंडाला दारूचा वास आल्याने आपण तो देण्यास आपण नकार दिल्याने त्याचा राग येऊन त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी नितीन चिटणीस हा संवत्सर येथील रहिवाशी असून तेथे तो आपल्या आई,वडील,पत्नी,व तीन मुले आदींसह एकत्र राहतो.तो आपल्या कामासाठी कोपरगाव येथे दि.०४ नोव्हेम्बर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या काही साधनाने आला होता.तो सकाळी साईबाबा कॉर्नर येथे घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभा असताना त्याच्या जवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन तरुण आले व त्यांनी,”आम्हाला फोन करण्यासाठी तुझा फोन दे”असे म्हणून माझ्या मालकीचा फोन अनाधिकाराने मागितला मात्र आपल्याला त्यांच्या तोंडाला दारूचा वास आल्याने आपण तो देण्यास आपण नकार दिल्याने त्याचा राग येऊन त्यांनी आपल्याला शिवीगाळ सुरु केली.काही वेळाने ते निघून गेले व थोड्या वेळाने पुन्हा येऊन त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडच्या लोखंडी रॉडने आपल्या डोक्यात मारहाण केली.व जाताना तू आमच्या नादी लागला तर तुला ठार मारून टाकील” अशी धमकी देऊन ते निघून गेले आहे.त्या नंतर शुभम जाधव व राहुल जाधव या आपल्या मित्रांनी आपल्याला उपचार करण्यासाठी निवारा परिसरातील खाजगी रुग्णालयात घेऊन गेले.उपचारानंतर आपण कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.८०९/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी तुषार चव्हाण व गणेश लोखंडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close