कोपरगाव तालुका
कोपरगावात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा गणेशा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान महाराष्ट्र भर सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातही उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरगाव तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी,नगरसेवक,सरपंच,महिला आघाडी,वाहतूक सेना,अपंग सेना,एस.टी.कामगार सेना पदाधिकाऱ्यांच्या व तमाम शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सदस्य नोंदणीचा जोरदार शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोपरगाव,श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातून प्रत्येकी तीस हजार सदस्यांची नोंदणी करून दाखवणार आहोत.तसेच प्रत्येक प्रभागात जाऊन सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे-राजेंद्र झावरे,जिल्हाध्यक्ष शिवसेना उत्तर नगर.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की,”पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोपरगाव,श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातून प्रत्येकी तीस हजार सदस्यांची नोंदणी करून दाखवणार आहोत.तसेच प्रत्येक प्रभागात जाऊन सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,शहर प्रमुख कलविंदर दडियाल आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
या वेळी विधानसभा संघटक अस्लम शेख,युवासेना सहसचिव सुनिल तिवारी,एस.टी.कामगार सेना जिल्हाप्रमुख किरण बिडवे,मुन्ना आव्हाड,माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव,सरपंच संजय गुरसळ,अशोक कानडे,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,माजी नगरसेवक अतुल काले,नगरसेविका सपना मोरे, वर्षा शिंगाडे,किरण खर्डे,विक्रांत झावरे,मुन्ना मन्सुरी,दिलीप अरगडे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे,भूषण पाटणकर,गोपाळ वैरागळ,आकाश कानडे,गगन हाडा,संघटक नितीन राऊत,बाळासाहेब साळुंके,सह संघटक वैभव गिते,सागर जाधव,विभागप्रमुख रफिक शेख,विजय शिंदे,दिपक बरदे,मयुर दळवी,समीर शेख,आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.