जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात दहा जणांवर कारवाईचा बडगा

जाहिरात-9423439946

कोपरगाव शहरात दहा जणांवर कारवाईचा बडगा

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषाणूची साथ बऱ्या प्रमाणात नियंत्रणात आली असून गत सहा महिन्यात ०२ हजार १०८ जणांना कोरोना विषाणूंचा डंख झाला असून तर आज अखेर ३७ जणांचा मृत्यू झाल्याने आता परिणामस्वरूप साथ कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून आज सकाळी १२.३० च्या सुमारास धारणगाव रोडवर माधव बागेसमोर केलेल्या कारवाईत दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार १०८ इतकी झाली आहे.आता केवळ १८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७५ टक्के आहे.आतापर्यंत १२ हजार ०६४ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४८ हजार २५६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.४६ असा आढळला आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.अजून काही दिवस दक्षता घेणे गरजेचे आहे.

आज त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळेच कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली असली तरी बेशिस्त नागरिकांमुळे हि साथ कधीही डोके वर काढू शकते.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे आजही पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई तहसील नजीक धारणगाव रोडवर करण्यात आली आहे.

त्यात विलास साहेबराव धनराव वय-३० रा.दहिवाडी ता.सिन्नर,शैलेंद्र सुभाष उबाळे वय-२८,रा.दहिवाडी,दिनकर उत्तम दवंगे वय-५०,रा.मळेगाव थडी,तन्वीर फकीर शेख,वय-२५,रा.खडकी,गणेश भागवत मोरे,वय-२४,ज्ञानेशवर शिवराम दवंगे वय-४७, दोघे रा.मळेगाव थडी,भास्कर रावसाहेब चव्हाण वय-४१.जेऊर कुंभारी,अनिल ताराचंद कोठारी,वय-५५,रा.गोकुळ नगरी,धर्मराज विजय काटे,वय-२३,रा.धामोरी,बाळासाहेब कडकू आवारे,वय-४८, रा.शिरवाडे,वाकद,ता.निफाड.आदी दहा जणांवर कारवाई केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ यांनी गुन्हा क्रं.७९१/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तापास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close