जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पोलिसांनी धाक निर्माण करून नागरिकांचे संरक्षण करा -..या नेत्याचे आवाहन!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  आगामी महत्वाचे सण उत्सवाचा काळ आला असताना कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांनी धाक निर्माण करून नागरिकांच्या जीविताच्या आणि वित्तीय मालमत्तेचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी आज आयोजित एका बैठकीत केली आहे.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आढावा बैठकीत आ.आशुतोष काळे,पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे,संभाजी गायकवाड आदी दिसत आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात आज धारणगाव रोड येथे कापड दुकानाचे उद्घाटनासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आले होते.त्यांच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली असता त्याठिकाणी एका पाकिटमाराने आपली हात की चलाखी दाखवली असता त्या ठिकाणी धरा…!धरा…! पळा…! पळा…! असा आवाज झाला त्यामुळे याची गंभीर दखल पालकमंत्री यांनी घेतली असल्याने आ.आशुतोष काळे यांनी ही बैठक तातडीने घेतली असल्याचे बोलले जात आहे.

     कोपरगाव शहरात आणि परिसरात सध्या चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील बाजारपेठा,महामार्ग आणि निवासी परिसरांना चोरट्यांनी लक्ष केले असून,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  नगर-मनमाड महामार्गावरील कापड दुकान आणि शहरातील श्रीराम पार्क परिसरातील बंद घरे चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांची रोकड व दागिने लंपास केले आहेत.गवारे नगरमधील ‘रॉयल ड्रीम सिटी’ अपार्टमेंटमध्येही घरफोडीचा मोठा प्रयत्न झाला.राम मंदिर रोड परिसरात सहवास सोसायटीत नुकताच चोरीचा प्रयत्न झाला असून त्याची तक्रार संदीप अशोक रोहमारे यांनी केली असल्याच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आ.आशुतोष काळे यांनी शहर पोलिस ठाण्यात एका बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आढावा बैठकीत उपस्थित नागरिक.

“कोपरगाव तालुक्यात सौर पॅनल,त्याच्या केबल,विद्युत पंपाच्या,चोऱ्या वाढल्या आहेत.पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे आहे.शिवाय गावागावात गस्ती पथके स्थापन करणे गरजेचे बनले असल्याचे सांगून पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर निर्माण होण्याची गरज आहे”- शिवाजी ठाकरे,ज्येष्ठ कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट.

सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे,माजी गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,नगरसेवक महमूद सय्यद,सुनील गंगूले,रमेश गवळी,शिवाजी खांडेकर,प्रशांत वाबळे,राजेंद्र वाघचौरे,शिवाजी ठाकरे,फकीर कुरेशी,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे,तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,सचिन गवारे,दिनकर खरे, आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 

दरम्यान यावेळी कोपरगाव शहरातील पत्रकारांनी पोलिस ठाण्यातून गुन्हा दाखल झाल्यानंतर दैनिक अहवाल अथवा गुन्ह्यांची माहिती देण्यास ठाणे अंमलदार टाळाटाळ केली जाते.त्यातून जनतेत पत्रकार जागृती केली जाते त्यामुळे सदर माहिती पोलिसांनी द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांचे उपस्थितीत केली आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना आ.काळे म्हणाले की,गुन्हेगारांवर जरब बसावी,चोरीचे गुन्हे कमी होणे गरजेचे असून महिला,मुली,तरुण आदींना सुरक्षित वाटावे यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले आहे.पालकमंत्र्यांच्या बैठकीत पाकिटमारी होते ही चिंताजक बाब आहे.वर्तमानात नवरात्र महोत्सव असून महिला दागिने घालून येतात.आगामी काळात दसरा,दिवाळी आदी महत्वाचे सण आहे.त्यातून नागरिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.त्यासाठी पोलिसांनी जागरूक रहाणे गरजेचे आहे.कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांनी धाक निर्माण करणे गरजेचे आहे.हे असेच होत राहिले तर कायदा सुव्यवस्था कशी टिकणार असा सवाल निर्माण होईल पोलिस अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

   दरम्यान यावेळी संदीप बिडवे यांच्या आई बसमध्ये चढत असताना सोन्याची पोत ओढून नेली असल्याची तक्रार केली आहे.कोपरगाव बस स्थानकात पोलिस आणि होमगार्ड जागेवर नसतात.त्यामुळे गुन्हेगारी वाढली असल्याची तक्रार बिडवे यांनी केली आहे.

  दरम्यान यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी ठाकरे यांनी “कोपरगाव तालुक्यात केबल,विद्युत पंपाच्या,चोऱ्या वाढल्या आहेत.पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे आहे.शिवाय गावागावात गस्ती पथके स्थापन करणे गरजेचे बनले असल्याचे सांगून पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर निर्माण होण्याची गरज प्रतिपादन केली आहे.तर नगरसेवक मेहमूद सय्यद आदींनी चोऱ्या कमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना केली आहे.यावेळी शेवटी उपस्थितांचे आभार पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी मानले आहे.

 

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close