गुन्हे विषयक
दरोड्यातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सुमारे 10 लाख रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कार्तिक निकम याला कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या रात्रीच्या गस्ती पथकाने माहेगाव-देशमुख या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास पकडला असून त्याच्या मुसक्या आवळल्या आहे.कोपरगाव तालुका पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

दरम्यान अटक आरोपीने दि.01 मार्च 2025 रोजी रात्री 01.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे,(वय 79 वर्षे),रा.खानापुर,ता.श्रीरामपुर यांचे घरात त्यांचे अन्य सहा अनोळखी सहकाऱ्यांच्या माध्यमातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घरात प्रवेश घरात फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवुन,तोंड दाबुन तिच्या अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 9 लाख 80 हजार रुपये किमतीचा दरोडा टाकुन ऐवज चोरुन नेला असल्याची कबुली दिली आहे.मात्र त्यानंतर तो फरार होता.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात घरफोडी,दुकानफोडी,चेन स्नॅचिंग आणि नाटेगावसारख्या भागात धाडसी दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.याशिवाय अवैध दारूविक्री, जुगार आणि वाळू उपशासारखे अवैध व्यवसाय देखील वाढले असून,नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.गांधीनगर व इतर परिसरांमध्ये दुकानफोडी आणि घरफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत.दुचाकी आणि चार चाकी वाहनाच्या चोऱ्याही होत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका पोलिस अधिकारी संभाजी गायकवाड यांनी आपल्या गस्ती पथकांवर जबाबदारी वाढवली आहे.परिणामी त्यांची तालुक्यातील गावात रात्रीच्या फेऱ्या वाढल्या आहेत.त्याचे आता चांगले परिणाम समोर येताना दिसून येत आहे.काल अशीच एक घटना उघडकीस आली असून यातील पथक दि.16 ऑगस्ट रोजी गस्तीवर असताना त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास माहेगाव-देशमुख गावात संशयीत इसम बेकायदेशिर कृत्य करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती.त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली असता त्यात सत्यता आढळून आली आहे.त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचें नाव,गाव विचारले असता व त्याला आपला पोलिसी हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला होता.

दरम्यान त्यात त्याने नंतर केलेल्या चौकशीत आपण,”दि. 01 मार्च 2025 रोजी रात्री 01.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे,(वय 79 वर्षे),रा.खानापुर,ता.श्रीरामपुर यांचे घरात त्यांचे अन्य सहा अनोळखी सहकाऱ्यांच्या माध्यमातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घरात प्रवेश घरात फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवुन,तोंड दाबुन तिच्या अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 9 लाख 80 हजार रुपये किमतीचा दरोडा टाकुन ऐवज चोरुन नेला असल्याची कबुली दिली आहे.सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी कार्तिक निकम याच्या साथिदारांना अटक करण्यात आली होती.परंतु तो गुन्हा घडल्यापासुन फरार होता.मात्र पोलिसांच्या गस्ती पथकाने त्याला अटक केल्याने श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे.
दरम्यान ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,शिर्डी येथील उप-विभागिय पोलीस अधिकारी अमोल भारती,पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी,पोलिस कॉन्स्टेबल रशिद शेख,प्रकाश नवाळी,सागर शेवाळे,चालक अनिल फाळके व अमोल तासकर आदींच्या पथकाने पार पाडली आहे.



