गुन्हे विषयक
गोदावरी पुलावरून उडी मारून आत्महत्या,अकस्मात मृत्यू नोंद !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेले इसम दादा विठ्ठल काळे यांनी आपली जवळची व्यक्ती घरातून काही एक न सांगता निघून गेली याचा संताप करत गोदावरी नदीच्या मोठा पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली असल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत इसम यांनी आपली जवळची व्यक्ती ही तिसऱ्यांदा बेपत्ता झाल्यावर त्याबाबत खबर देण्यासाठी संबंधी पोलिस ठाण्यात गेले.त्या ठिकाणी आपली जवळची व्यक्ती हरवली असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती.मात्र तिचा ठावठिकाणा न लागल्याने व आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्यावर ही वेळ आणली असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.त्याबाबत त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे बोलले जात आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,मयत दादा काळे यांची एक जवळची व्यक्ती घरातून निघून गेली होती.यापूर्वीही अशीच दोनदा घटना घडली होती.मात्र त्यांनी समजावून सांगून पाहिले व पुन्हा गाडी रुळावर आणली असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे.मात्र पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती घडल्याने त्यांचा वडील म्हणून संताप झाला असल्याची नागरिकांत चर्चा आहे.त्यामुळे त्यांनी त्याच संतापातून दि.27 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पाऊल टाकले होते.त्यांचा शोध घेऊनही ते मिळून आले नव्हते.

दरम्यान काही नागरिकांनी त्याच दिवशी दुपारी एका इसमाने नगर मनमाड रस्त्यावर असलेल्या गोदावरी मोठ्या पुलावरून एका इसमाने उडी मारून आपले जीवनयात्रा संपवली असल्याचे पाहिले होते.मात्र तो इसम कोण आहे त्यांना माहिती नव्हते.दरम्यान ही खबर नागरिकांनी कोपरगाव शहर पोलिसांना कळवली होती.त्यांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत संबंधित इसमास बाहेर काढले होते.त्याचा पंचनामा करून सदर इसमास तपापासनीस कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर सदर इसम मृत्यू पावला असल्याची घोषणा केली होती.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या इसमाचा शोध घेतला असता तो शुभम जाधव यांचा सासरा असल्याचे उघड झाले होते.त्याबाबत त्यांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला होता.सदर इसम तुमच्या ओळखीचा आहे हा याची खातरजमा करण्यास सांगितले होते.त्यांनी दवाखान्यात जाऊन पाहिले असता ते त्यांचे सासरे दादा विठल काळे रा.संजयनगर असल्याचे उघड झाले होते.त्यावेळी त्यांनी आपल्या जबाबात मयत इसम यांची एक जवळची व्यक्ती काही दिवसापूर्वी घरातून निघून गेली होती.त्यामुळे ते घराची बेइज्जती होईल या भीतीने तणावात होते.त्यांनी त्याच तणावात गोदावरी पुलावरून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक-38/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम-194 प्रमाणे या घटनेची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल जालिंदर तमनर हे करीत आहेत.
दरम्यान याबाबत माहिती घेतली असता मयत इसम हे आपली जवळची व्यक्ती ही तिसऱ्यांदा बेपत्ता झाल्यावर त्याबाबत खबर देण्यासाठी संबंधी पोलिस ठाण्यात गेले होते.त्या ठिकाणी आपली जवळची व्यक्ती हरवली असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती.मात्र तिचा ठावठिकाणा न लागल्याने व आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्यावर ही वेळ आणली असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.त्याने याबाबत एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्याने आपल्या मृत्यूस आपली मुलगी आणि जावई यांचा काही एक दोष नसल्याची माहिती हाती आली आहे.



