गुन्हे विषयक
दोन गटात मारहाण,तीन जखमी,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील रहिवासी असलेले फिर्यादी नवनाथ बाबासाहेब गव्हाळे यांनी कांदे टाकण्यास अडथळा केल्याचे कारणावरून दोन गटात मारहाण झाली असून यातील आरोपी बापू लहानू गव्हाळे,लहानु बाजीराव गव्हाळे,ताराबाई शहाराम गव्हाळे,मिराबाई शहाराम गव्हाळे आदी चार जणाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे आपेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी शेतकरी नवनाथ गव्हाळे यांनी त्यांचे शेतातून काढलेला कांदा ठेवण्यास त्यांचे भावबंध असलेले आरोपी शेतकरी बापू गव्हाळे आणि कुटुंबाने काल 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.50 वाजता विरोध केल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.त्यातून आरोपी गव्हाळे आणि अन्य कुटुंबीय यांनी नवनाथ आव्हाळे यांना आणि त्यांचे भाऊ,भावजय यांना काठीने मारहाण करून कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
कोपरगावसह राज्यात वर्तमानात कांदा पिकास भाव नसतानाही शेतकऱ्यांकडून कांदा काढण्याचे काम जोरात सुरू आहे.त्यातच राज्याचे हवामान खात्याने उच्च तापमान व आणि केलेले आवकाळी पावसाचे सूतोवाचयामुळे शेतकऱ्यांत हातचे पीक जाण्याची भीती वाढली आहे.परिणामी शेतकरी जीवाची पर्वा न करता आपला कांदा काढण्यास नाईलाजाने पवृत्त होताना दिसत आहे.त्यातच की काढलेले पिके झाडाच्या सावलीत ठेवण्याचे प्रयत्न होत असून यातून वृक्षवल्ली कमी झाल्याने सदर काढलेला कांदा नेमका कोठे ठेवायचा यावरून शेतकऱ्यांत वाद होताना दिसून येत आहे.अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यात असलेल्या आपेगाव ग्रामपंचायत हद्दीत उघडकीस आली आहे.यातील फिर्यादी शेतकरी नवनाथ गव्हाळे यांनी त्यांचे शेतातून काढलेला कांदा ठेवण्यास त्यांचे भावबंध असलेले आरोपी शेतकरी बापू गव्हाळे आणि कुटुंबाने काल 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.50 वाजता विरोध केल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.त्यातून आरोपी गव्हाळे आणि अन्य कुटुंबीय यांनी नवनाथ आव्हाळे यांना आणि त्यांचे भाऊ,भावजय यांना काठीने मारहाण केली आहे.व “ही आमची जागा आहे; कोण आम्हांला कांदे टाकायला आडवतो त्यांना बघतोच असा दम दिला व शिवीगाळ व दमदाटी केली व कोयत्याने जिवेच ठार मारतो अशी धमकी दिली आहे.दरम्यान या घटनेत फिर्यादी नवनाथ आव्हाळे,त्यांचा भाऊ,आणि भावजय असे तीन जण जखमी झाले आहे.
दरम्यान या घटनेने घाबरून जाऊन फिर्यादी नवनाथ गव्हाळे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा क्रं.157/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1),115(2),352,351(2),3(5) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल आर.ओ.कारखेले हे करीत आहेत.



