गुन्हे विषयक
कोपरगावात चोरट्यांनी साधला मोठा डाव,गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तीळवणी नजीक असलेल्या उपबाजार समितीजवळ रात्रीच्या सुमारास एक जोडपे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना पाठलाग करणाऱ्या अज्ञात चौघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले असून बायकोच्या अंगावरील दागिन्यांसह ४५ हजार ६०० रुपयांची लूट केली असल्याची बातमी प्रसिद्ध होऊन त्याची शाई वाळते न वाळते तोच काल रात्री शहरात पुन्हा चोरट्यांनी डाव साधला असून बाजार समितीच्याजवळ रेव्हेन्यू कॉलनी जवळ रहिवासी असलेल्या डॉ.विकेकांनद सुर्यवंशी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम आणि सोने नाणे आदी ३.६० लाखांचा ऐवज लंपास केला असल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

काल रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी रेव्ह्यून्यू कॉलनी नजीक खडकीरोडला लागून रहिवासी असलेल्या डॉ.विवेकानंद वामनराव सूर्यवंशी (वय-६७) यांच्या घरात कोणी नाही यावर पाळत ठेवून त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटाची उचकपाचक करून त्यातील ०३ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात विविध गुन्हे वाढत असल्याचे वारंवार उघड होत आहे.घरातील लूट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी काकडीतील तीन बळी घेतले असताना शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सचिन वॉच या कंपनीतील घड्याळाची भल्या पहाटे ३० लाख रुपयांची लूट केली होती.त्यातील काही आरोपी पकडले आहे तर अद्याप काही फरार आहेत.अशातच शहरातील शांतता भंग होण्याच्या घटना वारंवार होत असताना आता पुन्हा चोरट्यांनी उचल खाल्ली असून काल रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी रेव्ह्यून्यू कॉलनी नजीक खडकीरोडला लागून रहिवासी असलेल्या डॉ.विवेकानंद वामनराव सूर्यवंशी (वय-६७) यांच्या घरात कोणी नाही यावर पाळत ठेवून त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटाची उचकपाचक करून त्यातील ०३ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम व दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने त्यात रींगा आणि सोन्याची चेन,कानातील टॉप्स असा अवैज चोरट्यांनी लंपास केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी घटनास्थळी शिर्डी येथील पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने,पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार,पोलिस उपनिरीक्षक संजय पवार आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादी डॉ.सुर्यवंशी यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.२४८/२०२५ भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम ३३१(३),३३१(४).३०५(अ)प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.तर पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.