जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बस स्थानकावर सोन्याची पोत लांबवली,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव येथे राज्य परिवहन मंडळाच्या बस आगारात वैजापूर-कोपरगाव बस मध्ये चढताना अज्ञात चोरट्याने सुमारे अर्धा तोळा वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबवली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी महिला धारणगाव तालुका कोपरगाव येथील महिला मुक्ताबाई माधवराव चौधरी (वय-६०) यांनी दाखल केली आहे.त्यामुळे महिला प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

  

फिर्यादी महिला मुक्ताबाई चौधरी या कोपरगाव-वैजापूर बस मध्ये चढल्या होत्या.त्या साईबाबा नाक्यावर गेल्या असता त्यांच्या लक्षात आले की आपल्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळा वजनाची सोन्याची पोत नाहीशी झाली आहे.त्यानी  आधी बस मध्ये इकडे तिकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की सदर सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन काढून घेतली आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर आणि तालुका हद्दीत चोरट्यांनी आपल्या लीलांनी जनतेला हैराण केले आहे.त्यात नदीकाठच्या विद्युत पंपांच्या तांब्याच्या तारा काढून चोरी करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत तर छोट्या चोऱ्यांचे  प्रमाण विलक्षण वाढले आहे.अशीच घटना नुकतीच आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास धारणगाव येथील रहिवासी महिला मुक्ताबाई चौधरी या आपली करंजी येथील मुलगी उषा सोपान कुहीले यांना भेटण्यासाठी जात असताना त्या कोपरगाव बस आगारात आल्या होत्या.त्यावेळी त्या कोपरगाव-वैजापूर बस मध्ये चढल्या होत्या.त्या सदर बसमध्ये बसून साईबाबा नाक्यावर गेल्या असता त्यांच्या लक्षात आले की आपल्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळा वजनाची सोन्याची पोत नाहीशी झाली आहे.त्यानी आपली सून हेमलता चौधरी यांचे सहाय्याने आधी बस मध्ये इकडे तिकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की सदर सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन काढून घेतली आहे.त्यावेळी गाडीतून उतरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.सदर दागिन्यांची पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात किंमत १५ हजार गृहीत धरली आहे.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१४६/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३०५,(सी) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पोलीस हे.कॉ.आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close