जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकावर अट्रॉसिटी तर तीन जणांवर चाकूचा वार केल्याचा गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कोळगाव पाटी येथील आरोपी सतिष नजन गवळी यांनी चारी नांगरल्याच्या कारणावरून वाद होऊन त्यांच्या विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा फिर्यादी त्याच गावातील महिलेनं दाखल केला आहे.तर दुसरा गुन्हा सतीष गवळी यांनी केला असून त्यांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोळगाव पाटीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

दरम्यान या प्रकरणी दूसरा गुन्हा फिर्यादी सतिष सर्जेराव गवळी यांनी दाखल करून आरोपी म्हणून किरण चंद्रभान मोकळ,रमाबाई चंद्रभान मोकळ,चंद्रभान अंकुश मोकळ,सर्व राहणार मधी बु.कोळगाव पाटी यांचे विरुध्द चाकूने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला रमाबाई चंद्रभान मोकळ (वय-६०)रा.कोळगाव पाटी यांचे शेताचे नाजिक आरोपी सतिष गवळी यांची जमीन आहे.त्यांचे किरकोळ वाद आहेत.मात्र दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्यां सुमारास फिर्यादी महिला रमाबाई मोकळं व त्यांचे पती हे आपल्या शेत गट क्रमांक १२२ मध्ये मकाचे पिकास पाणी भरत असताना यातील आरोपी सतिष गवळी याने,”तुम्ही चारी का नांगरली ? असा जाबसाल करून चारीचे कारणावरून फिर्यादी व साक्षीदार यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना हाताचे चापटीने मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५(२),३५१(२),(३)अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९९८ चे कायदा कलम ३(१),(१०),प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी वमने हे करत आहेत.

   दरम्यान या प्रकरणी दूसरा गुन्हा फिर्यादी सतिष सर्जेराव गवळी यांनी दाखल करून आरोपी म्हणून किरण चंद्रभान मोकळ,रमाबाई चंद्रभान मोकळ,चंद्रभान अंकुश मोकळ,सर्व राहणार मधी बु.कोळगाव पाटी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करून त्यात म्हंटले आहे की,”दिनांक ०६ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजता घटना घडली असे सांगून त्यात त्यांनी आपल्याला शेत गट क्रमांक १२९ मध्ये आपली आई शेतात बाधांचे कडेला गवत घेत असताना चारीच्या किरकोळ कारणावरून आपल्या आईला आरोपी शिवीगाळ करत होते.त्यांना आपण समजावून सांगत असताना आरोपी किरण चंद्रभान मोकळ याने आपल्या खिशातील चाकू काढून आपल्या उजव्या हातावर मारून आपल्याला जखमी केले असल्याचे म्हंटले आहे.त्यांनी आरोपी किरण मोकळ,रमाबाई मोकळ,चंद्रभान मोकळ,आदी विरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),३५२,३५१,(२),३(५)प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.श्री.दहिफळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close