जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलींचा छळ,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या व एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांच्या घरापर्यंत पाठलाग केल्या प्रकरणी मोरे (वय-२८) नामक आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात,’पोस्को’चा गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

दि.२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ ते ११ वाजता आरोपीने अल्पवयीन मुलीचा (वय-११ वर्ष) व तिच्या मैत्रिणीचा (वय-१३ वर्ष) यांना शाळेच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर पाठलाग करून,”तुम्ही मला आवडता” असे म्हणून त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना हाताने इशारा करून छळ केला आहे.या प्रकरणी कोपरगावात गुन्हा दाखल झाला आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोस्को) कायदा, २०१२ हा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी लागू केलेला विशेष कायदा आहे.हा कायदा लहान मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करतो आणि अशा प्रकरणांच्या तपासासाठी आणि खटल्यासाठी काही विशेष प्रक्रिया निर्धारित करतो.हा कायदा झाल्यापासून सदर गुन्ह्यात कमी येणे अपेक्षित असताना राज्यात अद्यापही हे गुन्हे थांबलेले दिसत नाही अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली असून त्या गुंह्यातील पीडित मुलीचा पिता फिर्यादी असून त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”आपण व आपली मुलगी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असून दि.२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ ते ११ वाजता आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीचा (वय-११ वर्ष) व तिच्या मैत्रिणीचा (वय-१३ वर्ष) यांना शाळेच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर पाठलाग करून,”तुम्ही मला आवडता” असे म्हणून त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना हाताने इशारा करून छळ केला आहे.

   या प्रकरणी गांभीर्य ओळखून घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेटी दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५४१/२०२३ ३५४,३५४ (ड) बालकांचे लैंगिक   अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक येसेकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close