जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चाकूने वार,तरुण जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी व हॉटेल अशोका येथे व्यवस्थापक असललेला तरुणाने आरोपीकडे जेवणाचे व दारूचे बिल मागितले असता त्याचा राग येऊन आरोपी शुभम साहेबराव आरगडे (वय-२५) याने आपल्या हातातील चाकूने त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला असून त्यात फिर्यादी अक्षय सुरेश शेलार (वय-२९) रा.जुनी मामलेदार कचेरी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.दरम्यान आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरात घडलेल्या चाकू हल्ल्यात जखमी तरुण अक्षय शेलार उपचार घेताना दिसत आहे.

   

आरोपीनी जेवण करताना भरपेट दारू ढोसली होती.त्यानंतर तो जेवण आटोपल्यावर जेवण व मद्याचे बिल न देताच व हॉटेल मालकांचा जावई असल्याच्या थाटात थेट ते बाहेर पडू लागले होते.त्यावेळी व्यवस्थापक असलेल्या अक्षय शेलार याने त्यास व त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांस हटकले होते व हॉटेलचे बिल मागीतले होते.नेमका त्याचाच त्यास राग आल्याने त्यांनी हा हल्ला केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात  मागील सप्ताहात दिपावली पाडव्याच्या दिवशी काही हद्दपार गुंडांनी गोळीबार करून पोबारा केला असताना व त्यानां अद्याप अटक झाली नसताना शहरात अन्य अनेक गुन्हे वाढले असल्याचे वारंवार सिद्ध होत असून पोलीस अधिकाऱ्यांना आता कडक भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे दिसत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगर-मनमाड मार्गावर येवला रोडच्या लगत असलेल्या,’हॉटेल अशोका’ येथे रात्री घडली आहे.

दरम्यान या घटनेतील शुभम आरगडे व अक्षय जगताप यांना पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,संभाजी शिंदे आदींनी तातडीने हालचाल करून त्यांना जेरबंद केले असून गुंह्यातील चाकू जप्त केला आहे.यातील अन्य एक आरोपी रोहित साळवे हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.मात्र पोलिसांनी आता कडक भूमिका घेतल्याने तो जास्त काळ पळू शकणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.दरम्यान पोलीस अधिकारी आता ऍक्शन मोडवर आल्याने गुन्हेगार किती पळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यात आरोपी शुभम आरगडे हा व त्याचे अन्य दोन सहकारी अक्षय खंडेराव जगताप (वय-२७),रोहित छगन साळवे (वय-३१) सर्व रा.कोपरगाव आदी सदर हॉटेल मध्ये जेवण करण्यास गेले होते.दरम्यान त्यावेळी त्यांनी भरपेट दारू ढोसली होती.त्यानंतर तो जेवण आटोपल्यावर जेवण व मद्याचे बिल न देताच व हॉटेल मालकांचा जावई असल्याच्या थाटात थेट ते बाहेर पडू लागले होते.त्यावेळी व्यवस्थापक असलेल्या अक्षय शेलार याने त्यास व त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांस हटकले होते व हॉटेलचे बिल मागीतले होते.नेमका त्याचाच त्यास राग आला होता.त्यावर त्याने त्याने फिर्यादी व्यवस्थापक शेलार यास त्याच्या सहकाऱ्यास पकडण्यास सांगून त्याने आपल्या स्कुटीच्या डिकीतून चाकू काढून त्याने व्यवस्थापक असलेल्या तरुणावर थेट हल्ला चढवला आहे.व त्यास त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे.या घटनेत फिर्यादी शेलास यास पोटावर उजव्या बाजूस  दोन गंभीर वार  झाले असल्याचे उघड झाले आहे.सदर घटनेनंतर आरोपींनीं घटनास्थळावरून पलायन केले आहे.

   या प्रकरणी गांभीर्य ओळखून घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलीस उपनिरीक्षक संजय पवार,भरत दाते आदींनी भेटी दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५४४/२०२३ भा.द.वि.कलम ३०७,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close