जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोघांचा खुनी हल्ला,तीन ठार,तीन जखमी,सर्वत्र खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


शिर्डीजवळ असणा-या विलासनगर निमगाव येथे कौटुंबिक वादातून जावई सुरेश विलास निकम व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम रा.संगमनेर यांनी २० सप्टेबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घरी जाऊन पत्नी वर्षा सुरेश निकम,मेहुणा रोहीत गायकवाड व आजेसासु हिराबाई गायकवाड यांच्यावर घरात प्रवेश करत चाकूच्या सहाय्याने खुनी हल्ला केला असून यात ३ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे निमगाव सह उत्तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेचा आमच्या प्रतिनिधीने मागोवा घेतला असता आरोपी नवरा आणि त्याची बायको यांच्यात अविश्वास निर्माण झाला होता त्यावरून हे वाद वाढत गेले होते.व त्यातून हा प्रताप घडला असल्याचे समजले जात आहे.या जोडप्यास एक ०६ वर्षाचा मुलगा व एक ०५ महिन्याची मुलगी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील येसगाव हद्दीत नुकताच आर्थिक कारणावरून खून झाला असल्याची घटना ताजी असताना काल रात्री शिर्डी नजीक हाकेच्या अंतरावर असलेल्या निमगाव हद्दीत एक गंभीर घटना उघड झाली असून यात थेट जावयाने नवरा आणि बायकोच्या वादातून थेट तीन जणांना जीवनातून उठवले असून तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.यात आरोपी जावई हा संगमनेर तालुक्यातील रहिवासी असून त्याचे नाव सु रेश व आलास निकम व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम हि आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

संशयित दोन आरोपीचे छायाचित्र.

दरम्यान घटनेनंतर आरोपी सुरेश विलास निकम आणि रोशन कैलास निकम हे पळून जात असताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस व अ.नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश धाकराव यांनी  सहकाऱ्यांनी  घटना घडल्यानंतर पाच तासात अटक केली असल्याने पोलीस अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान या घटनेचा आमच्या प्रतिनिधीने मागोवा घेतला असता आरोपी नवरा आणि त्याची बायको यांच्यात अविश्वासन निर्माण झाला होता त्यावरून हे वाद वाढत गेले होते.व त्यातून हा प्रताप घडला असल्याचे समजले जात आहे.या जोडप्यास एक ०६ वर्षाचा मुलगा व एक ०५ महिन्याची मुलगी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान या घटनेत आणखी सासू,सासरे आणि मेहुणी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान आरोपीने पहिला हल्ला आजी सासु वर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.रागाच्या भरात भिषण घटना सन-२०११ नंतर तब्बल बारा वर्षांनी पाप्या शेखने केलेल्या दोन खुनानंतर पहिल्यांदा घडली आहे.


दरम्यान घटनेनंतर आरोपी सुरेश विलास निकम आणि रोशन कैलास निकम हे पळून जात असताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस व अ.नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश धाकराव यांनी  सहकाऱ्यांनी  घटना घडल्यानंतर पाच तासात अटक केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम व्यवसाय हमाली करत असून त्याचा अन्य सहकारी रोशन कैलास निकम यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जखमी योगीता जाधव हिच्या जवाबावरुन गुन्हा नोंद क्रं. ८६४/ २०२३ भा.द.वि. कलम ३०२,३०७,५०६,३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,“शिर्डीजवळील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत विलासनगर हे उपनगर असून येथे हे गायकवाड कुटुंब राहते.चांगदेव गायकवाड यांचे जावई सुरेश विलास निकम आणि त्यांचे नातेवाईक रोशन कैलास निकम (राहणार संगमनेर खुर्द, संगमनेर) हे दोघेजण रात्री अकरा वाजेच्या सुमारास सावळीविहीर येथील सासुरवाडी येथे आले.त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद होते.त्याचा फायदा घेत आरोपीने निमगाव येथे रात्री येऊन घराचा दरवाजा उघडताच या दोघांनी घरातील सहा नातेवाईकांवर चाकूने बेछूट हल्ला केला.या हल्ल्यामध्ये सुरेश निकमची पत्नी वर्षा निकम,मेहुणा रोहित गायकवाड आणि आजी सासू हिराबाई गायकवाड यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.तर सासरे चांगदेव गायकवाड सासु संगिता गायकवाड  मेहुणी योगीता जाधव यांच्यावर साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके तसेच पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,गणेश काळे,घटनास्थळी भेट दिली आहे.दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी नाशिकच्या दिशेने पसार झाले होते.

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा व शिर्डी पोलिसांचे मिळून चार पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली होती.आरोपींचे घटनास्थळाचे माहिती मिळताच ते नाशिककडे असल्याचे समजताच पोलिसांनी  तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शेळके,पोलिस उपनिरीक्षक रामदास विंचू यांना याबाबतची माहिती दिली आहे.
नाशिक रोड पोलिसांनी तातडीने पावले उचलत नाशिक-पुणे रोड वरील शिंदे गाव टोलनाक्याजवळ सापळा रचून मोटारसायकल वरून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम या दोघांना ताब्यात घेतले आहे.


या दोघांनी खुनाची  कबुली दिली आहे.त्यानंतर नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह नाशिक रोड येथे पोहचत,दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.या पथकात  विशाल दळवी  जालिंदर माने दत्तात्रय हिगडे संभाजी कोतकर यांचा समावेश होता

सहा वर्षी व सहा महिन्यांची मुलगी निराधार असून घरात व रस्त्यावर रक्ताचे धारोळे दिसून आले आहे.आरोपीने पहिला हल्ला आजी सासु वर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.रागाच्या भरात भिषण घटना सन-२०११ नंतर तब्बल बारा वर्षांनी पाप्या शेखने केलेल्या दोन खुनानंतर पहिल्यांदा घडली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close