निधन वार्ता
विनायकराव चिटणीस यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील विनायकराव पांडुरंग चिटणीस यांचे नुकतेच वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले असून संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कै.विनाकराव चिटणीस हे संवत्सर परिसरात गुरुजी या नांवाने सर्वत्र परिचित होते. वेदाचा चांगला अभ्यास असल्याने कोणत्याही विषयांवर ते चांगले भाष्य करीत असत. ते मुळचे वर्धा येथील होते. परंतु त्यांचे बंधू शंकरराव चिटणीस हे कान्हेगांव परिसरातील सोमैय्या उद्योग समुहात नोकरी निमित्ताने आले होते. त्यांच्या समवेत कै.विनायकराव हे देखील कोपरगांव तालुक्यात आले. आणि संवत्सर परिसरात स्थाईक झाले.त्यांचा सर्व परिवार संवत्सर गावाशी एकरुप झाला. कै. विनायकराव चिटणीस यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातून संवत्सरसह आसपासच्या गांवात चांगली ओळख निर्माण केलेली होती.छायाचित्रकार नितीन चिटणीस यांचे ते वडील होते.
कै.विनायकराव चिटणीस यांच्या निधनाबद्ल अनेकांनी शोक व्यक्त करुन अंत्यविधीच्यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.