जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कारची दुचाकीस धडक,पतिपत्नी जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव खडकी येथील गवारे वस्ती येथील रहिवासी अंबादास देवराव गवारे (वय-५१) हे नुकतेच आपल्या बजाज प्लॅटिना या दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सि.जी.०२५१) वरून आपल्या बहादराबाद येथील मुलीस भेटण्यास जात असताना त्यांना झगडे फाटा येथे चौफुलीवर नाशिकडून येणाऱ्या इनोव्हा कारने (डी.एन.०९ जी.२६१०) जोराची धडक दिली असून त्यात फिर्यादी व त्यांची पत्नी सिंधुबाई गवारे आदी दोघे जखमी झाले आहे.या प्रकरणी त्यांनी इनोव्हा कारचे चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जुन्या मुंबई-नागपूर या महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने या महामार्गावर वहाने भरधाव वेगाने जात असतात.त्या शिवाय गत मे महिन्यात समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे.दरम्यान समृद्धी महामार्गावर अतिरिक्त वेगाने अपघात जास्त होत असल्याने अनेकांना या जुन्या महामार्गावर वाहनाची मोठी वर्दळ वाढली आहे.शिर्डी मार्गे सिन्नर-अ.नगर या प्रशस्त चौपदरी मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून चांदेकसारे या हद्दीत झगडे फाटा येथील चौफुलीवर मात्र सिग्नल यंत्रणा नाही.शिवाय त्या ठिकाणी अद्याप दिशादर्शक फलक दाखवलेले नाही.त्यामुळे अनेक अपघात वाढले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,जुन्या मुंबई-नागपूर या महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने या महामार्गावर वहाने भरधाव वेगाने जात असतात.त्या शिवाय गत मे महिन्यात समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे.दरम्यान समृद्धी महामार्गावर अतिरिक्त वेगाने अपघात जास्त होत असल्याने अनेकांना या जुन्या महामार्गाची आठवण होत असल्याने या महामार्गावर वाहनाची मोठी वर्दळ वाढली आहे.त्यात शिर्डी मार्गे सिन्नर-अ.नगर या प्रशस्त चौपदरी मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.मात्र चांदेकसारे या हद्दीत असलेल्या झगडे फाटा येथील चौफुलीवर मात्र सिग्नल यंत्रणा नाही.शिवाय त्या ठिकाणी अद्याप दिशादर्शक फलक दाखवलेले नाही.त्यामुळे अनेक अपघात वाढले आहे.मात्र त्या पातळीवर कार्यवाही होत नसल्याने त्यावर उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.अशीच घटना दि.०९ जूलै रोजी दुपारी ०२ वाजता घडली आहे.

यातील फिर्यादी अंबादास गवारे हे आपल्या पत्नी सिंधुबाई गवारे यांना घेऊन सुवर्णा जालिंदर पाचोरे या मुलीच्या बहादराबाद या गावाकडे आपल्या वरील क्रमांकाच्या बजाज प्लॅटिना वरून जात असताना त्यानां वरील क्रमांकाच्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली त्यात फिर्यादी व त्यांची पत्नी हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.यात त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातानंतर वाहन चालकांने त्यांना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.व त्या नंतर वाहन चालक हा आपले वहान घेऊन निघून गेला होता.त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन काल दुपारी आरोपी चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे आदींनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा अनुक्रमे क्रं.३५१/२०२३ भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पो.हे कॉ.अमरनाथ गवसने हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close