अर्थ विषयक
…या पतसंस्थेने दिला तेरा टक्के लाभांश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील सहकारात अग्रणी समजल्या जाणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील श्री गोपाजी बाबा सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने या वर्षी दिवाळीसाठी आपल्या सभासदांना तब्बल १३ टक्के लाभांश जाहीर केला असून तो दिवाळीत सभासदांच्या खाती वर्ग केला असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष भागवत रहाणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
श्री संत सद्गुरु गोपाजी बाबा पतसंस्थेत आत्ता पर्यंत ०९ कोटी रुपयांची ठेवी असून संस्थेला सर्व वजावट जाता संस्थेला २१ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे.तसेच या वर्षी खास दिवाळीसाठी १३ टक्के लाभांश सर्व खातेधारकांना देण्यात आला आहे.तर कर्मचाऱ्यांना ३३.५ टक्के दीपावली बोनस दिला आहे-भागवत रहाणे, अध्यक्ष पतसंस्था.
कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडिल ग्रामीण भागातील आर्थिक गरज भागविण्यासाठी अग्रणी असलेल्या श्री संत सद्गुरु गोपाजी बाबा पतसंस्थेत आत्ता पर्यंत ०९ कोटी रुपयांची ठेवी असून संस्थेला सर्व वजावट जाता संस्थेला २१ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे.तसेच या वर्षी खास दिवाळीसाठी १३ टक्के लाभांश सर्व खातेधारकांना देण्यात आला आहे.तर कर्मचाऱ्यांना ३३.५ टक्के दीपावली बोनस दिला आहे.आत्तापर्यंत ग्रामीण भागात कोणत्याही पतसंस्थेने किंवा बँकेने १३ टक्के लाभांश दिला नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.
संस्थेच्या या यशात सर्व ठेवीदार,सभासद,संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,विजय रहाणे,संचालक,व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हाळस्कर व सर्व कर्मचारी यांनीं मालाची भूमिका निभावली आहे.त्यामुळे सर्व सभासदांना लाभांश देता आला आहे.त्याबद्दल अध्यक्ष भागवत रहाणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.