जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भक्तांच्या उपस्थितित वाकडीत मूर्ति वर्धापन सोहळा संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

वाकडी-(प्रतिनिधीं)

राहाता तालुक्यातील वाकड़ी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर,पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करत शेकडो मल्हारी भक्त व वाघे मंडळीच्या उपस्थितीत खंडोबाची वाकड़ी येथील खंडेराय महाराज मंदिरातील तिसावा मूर्ति स्थापना वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत नगर जिल्ह्याची प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकड़ी येथील खंडोबा महाराज मूर्ति स्थापना वर्धापन दिन सोहळा भाउबिज दिवशी साजरा करण्यात आला आहे.कोरोना सारख्या साथीमुळे गेली सहा महिने पासून सर्वच मंदिरे बंद होती.त्यामुळे वाकडी येथील यावर्षीचा खंडोबा मंदिर मधील मूर्ती स्थापना वर्धापण (भाऊबीज उत्सव) रद्द करण्यात आला होता.

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत नगर जिल्ह्याची प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकड़ी येथील खंडोबा महाराज मूर्ति स्थापना वर्धापन दिन सोहळा भाउबिज दिवशी साजरा करण्यात आला आहे.कोरोना सारख्या साथीमुळे गेली सहा महिने पासून सर्वच मंदिरे बंद होती.त्यामुळे वाकडी येथील यावर्षीचा खंडोबा मंदिर मधील मूर्ती स्थापना वर्धापण (भाऊबीज उत्सव) रद्द करण्यात आला होता. मात्र दिवाळी च्या तिसऱ्या दिवशी भाऊबीजला मंदिर खुली करण्याचा सरकारी आदेश आल्याने व योगायोग त्याच दिवशी खंडोबा मूर्ती स्थापना वर्धापण सोहळा असल्यामुळे अचानक हा उत्सव सायंकाळी न साजरा करता सकाळी साजरा करण्यात आला तरी देखील या उत्सव सोहळ्यामधे सुमारे शेकडो भाविकांनी सामूहिक जागरण घट भरविले होते व यावेळी पंचक्रोशितील वाघे मंडळी सुद्धा हजर होऊन देवाचे जागरण करून भंडारा उधळण करून जागर केला. वाकड़ी येथील खंडोबा महाराज मंदिर मधे सन् १९९१ साली येथील कै.ह.भ.प.रामनाथ बाबा कोते यांच्या हस्ते भाऊबिज दिवशी मूर्ति स्थापना करण्यात आली होती तेव्हा पासून मंदिरात दरवर्षी रामनाथ बाबा कोते यांच्या संकल्पनेतुंन वर्धापन सोहळा साजरा होत आहे.आता हा उत्सव त्यांचे चिरंजीव दत्तात्रय रामनाथ कोते यांच्या मार्गदर्शनखाली व भाऊबीज मित्र मंडळ यांच्या सहकार्यतुन सुरु राहणार आहे

एक जागरण गोंधळ करण्यासाठी एका कुटुंबास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो मात्र वाकडीच्या खंडोबा मंदिरात वर्धापन दिवशी अवघ्या दोनशे रुपयात प्रति कुटुंब जागरण होते वाकड़ी येथील खंडोबा मंदिर वर्धापन सोहळ्यानिमित गावातील तरुणानी जेजुरी ते वाकड़ी ज्योत आणली असता संपूर्ण गावातुन वाजत गाजत भंडाऱ्याची उधळन करत मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी या कार्यक्रमांस कोपरगांव मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी भेट दिली आहे.एकाच वेळी शेकडो जागरण गोंधळ व वाघे मंडळीचा एकाच ठिकाणी एका वेळी देवाचा जागर हा महाराष्ट्र राज्यातील वाकड़ी येथील खंडोबा मंदिरातील होणारा एकमेव सोहळा आहे.त्यामुळे परराज्यातिल भाविक व वाघे सुद्धा या ठिकाणी हजेरी लावतात या कार्यक्रमसाठी भाऊबीज मित्र मंडळ,खंडेराय देवस्थान ट्रस्ट,वाकडी ग्रामपंचायत,जय मल्हार प्रेस क्लब व ग्रामस्थ यांचे मोलाचं सहकार्य लाभले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close