
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी नशीब रहेमान पठाण यांनी नेहमी प्रमाणे आपली वरील हिरो कंपनीची स्प्लेंडर काळ्या रंगाची हि दुचाकी उमेद गनिभाई शेख यांच्या चांदेकसारे यांच्या घरासमोर कुलूप लावून उभी केलेली असताना दि.१० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेनंतर अज्ञात चोरट्याने तिचे कुलूप तोडून फिर्यादीचे संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने ती फरार केली आहे.हि बाब त्यांच्या सकाळी झोपेतून उठल्यावर लक्षात आली.याबाबत त्यानी कोपरगाव तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी दु.र.क्रं.५०१/२०२० भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. बी.बाबर हे करीत आहेत.