जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

उपजिल्हा रुग्णालयामध्ये खाटांची संख्या वाढणार – माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नास आ.आशुतोष काळे यांना यश आले कोपरगावला १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले असून सदर काम प्रगतीपथावर असून उपजिल्हा रुग्णालयामुळे कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्थाअधिक सक्षम होणार असल्याचा दावा माजी नगरसेवक विरेन बोरावके यांनी केला आहे.

  कोपरगाव मतदार संघापासून जवळपास १०० किलोमीटर दूरवर असून जिल्ह्याच्या उत्तर भागात एकही उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.या नूतन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे.

   कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लोकसंख्येच्या प्रमाणात कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यात असमर्थ ठरले होते.त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे आश्वासन दिले होते.त्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता.

त्याबाबत पुढील कार्यवाही तातडीने होवून उपजिल्हा रुग्णालयासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद व्हावी यासाठी त्यांनी  केलेल्या प्रयत्नातून २८.८४ कोटी निधी देखील मंजूर करण्यात येवून नुकतेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्रत्यक्षात काम सुरु झाले आहे.जिल्हा रुग्णालय कोपरगाव मतदार संघापासून जवळपास १०० किलोमीटर दूरवर असून जिल्ह्याच्या उत्तर भागात एकही उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.
या नूतन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टर्स,अतिदक्षता विभाग अशा विविध सेवा मिळणार असल्यामुळे अंत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही.त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले असल्याची माहिती विरेन बोरवके यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close