अर्थ विषयक
..या पतसंस्थेस १.५० कोटीचा निव्वळ नफा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पद्मविभुषण डॉ.शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेला २०२१/२२ या चालू आर्थिक वर्षात १ कोटी ४९ लाख ०७ हजार १०६ रुपये ढोबळ नफा झाला आहे.७५ लाख ४७ हजार ५५५ रुपयांची तरतूद केली असून ७३ लाख ५९ हजार ५५१ रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राधुजी कोळपे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
आज रोजी संस्थेची गुंतवणूक २२ कोटी ३८ लाख ६३ हजार असून संस्थेकडे भाग भांडवल ७९ लाख १६ हजार ३७५ रुपये आहे.३४ कोटी ०२ लाख ९८ हजार रुपयांच्या ठेवी असून मागील दहा वर्षापासून संस्थेस सतत ऑडीट वर्ग ‘अ’ आहे. संस्थेने एन. पी. ए. ची तरतूद ६ कोटी ६५ लाख ५० हजाराची केलेली असून त्यामुळे संस्थेचा एन.पी.ए.शून्य टक्के आहे.
संस्थेचे जेष्ठ संचालक माजी आ.अशोक काळे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीचे महत्वाचे टप्पे पार करीत आहे.दरवर्षी संस्थेकडे असलेल्या ठेवींमध्ये होत असलेली वाढ संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे संस्थेने आजपर्यंत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उद्योग समुहातील कर्मचारी,कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटे-मोठे व्यावसायिकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिले असून सभासदांचे आणि कर्जदारांचे हित लक्षात घेवूनच संस्थेचे कर्मचारी काम करीत असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष सोपानराव गुडघे व व्यवस्थापक बाळासाहेब काळे यांनी सांगितले आहे.