अर्थ विषयक
कोपरगाव तालुक्यातील…या बँकेस ३.१४ कोटींचा नफा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बँकेचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी ३ कोटी १४ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी आमच्या प्रतिनिधी दिली आहे.
गौतम बँकेने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ०१ कोटीच्या तरतुदी करून २ कोटी १४ लाख निव्वळ नफा मिळविला आहे आज मितीस बँकेचे वसुल भागभांडवल रुपये ५००.९२ लाख इतके आहे. बँकेच्या ठेवी ९९ कोटी ७५ लाख असून बँकेने ६३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक ४७ कोटी १२ लाख असून राखीव व इतर निधी १० कोटी ०८ लाख आहे.
ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळावी शेतकरी,कष्टकरी व सर्व सामान्य नागरिक यांचे हित जोपासले जावे या उद्देशातून कर्मवीर शंकरराव काळे यांनी सहकारी साखर कारखाना चालवला. त्याचबरोबर सहकार चळवळ गतीमान करण्यासाठी कारखान्याबरोबरच गौतम सहकारी बँकेची स्थापना केली होती.बँकेच्या माध्यमातून कामगार,शेतकरी व परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची आर्थिक अडचण सुटण्यास मोठी मदत झाली.परंतु मागील काही वर्षापासून बँक खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत होती.मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माजी आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली बँक पुन्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना संकटात देखील बँकेने लक्षवेधी कामगिरी केली आहे. चालू वर्षीदेखील आपला प्रगतीचा आलेख उंचावत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बँकेने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ०१ कोटीच्या तरतुदी करून २ कोटी १४ लाख निव्वळ नफा मिळविला आहे आज मितीस बँकेचे वसुल भागभांडवल रुपये ५००.९२ लाख इतके आहे. बँकेच्या ठेवी ९९ कोटी ७५ लाख असून बँकेने ६३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक ४७ कोटी १२ लाख असून राखीव व इतर निधी १० कोटी ०८ लाख आहे. रिझर्व बँकेच्या मापदंडाप्रमाणे सी.आर.ए.आर. ९ टक्के असणे आवश्यक आहे त्याचे प्रमाण बँकेने १९.२१ टक्के राखलेले आहे. बँकेची तरलता मध्ये रुपये १६२८.४७ इतकी जादा तरतूद आहे.बँकेची लिक्विडिटी मध्ये अद्याप डिफॉल्ट नाही.
अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळाचे माध्यमातून बँकेने बँक कार्यक्षेत्रातील होतकरू ग्रामीण भागातील उद्योजकांना लघु उद्योग धंद्यास चालना देण्यासाठी सर्वसाधारण रुपये १५ कोटीचे बिनव्याजी कर्ज वितरण केलेले आहे.बँकेने सर्व घटकांना न्याय देऊन प्रतिकूल परिस्थिती आपली प्रगती देखील साधली आहे. यामध्ये बँकेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष संचालक मंडळ व तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,सभासद,कर्जदार यांचे मोलाचे योगदान आहे याबद्दल माजी आ.काळे व आ. काळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.